बंद रस्ते खुले करण्यासाठी दोन सप्टेंबरपासून उपोषण – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
जेजुरी, ता.२७ : जेजुरीहून कोळविहिरे गावाकडे जाणारे दोन रस्ते रेल्वेच्या कामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. ते रस्ते ३१ ऑगस्टपर्यंत तातडीने खुले करावेत. अन्यथा
दोन सप्टेंबरपासून कोळविहिरेचे ग्रामस्थ भोरवाडी रेल्वेपुलावर उपोषणास बसणार करणार आहेत.
याबाबत सोमनाथ खोमणे यांनी ग्रामस्थांसह उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी, रेल्वे
विभाग व तहसील कार्यालय यांना निवेदन दिले आहे. कोळविहिरेसह पुढे आठ ते दहा गावांना जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. हे दोन्ही रस्ते रेल्वेने गेली सहा महिन्यापासून बंद केले आहेत. एका रस्त्यावर भुयारी मार्ग केला आहे. तर दुसऱ्या रस्त्यावर पूल बांधला आहे. रस्ता बंद करताना एप्रिल अखेर तीन महिन्यांत रस्ता सुरु केला जाईल, असे आश्वासन रेल्वेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र सहा महिने झाले तरी रस्ता बंदच आहे. यामुळे नागरिकांना पाच किलोमीटरचा वळसा घेऊन कामगारांना औद्योगिक वसाहतीत जावे लागते. विद्यार्थी, शेतकरी व प्रवाशांचे हाल होत आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares