राकेश टिकैत यांचा भाजप वर हल्लाबोल, तुमचा सुद्धा उद्धव ठाकरे – Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Written by

Rakesh Tikait | भाजप यांचं फोडाफोडीचा राजकारण रोखण्यासाठी आता… तुमचा देखील उद्धव ठाकरे होईल, राकेश तिकैट यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : भारतीय किसान युनियनचे नेते प्रवक्ता राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाचा पुढील टप्पा बिहारमधून होईल, असा दावा केला आहे. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन भाजप सोबतची युती तोडली नाही तर तुमचा देखील उद्धव ठाकरे होईल , असं त्यांना सांगितलं होत. मात्र, त्यानंतर तिथे घटनाक्रम झाला, असं त्यांनी सांगितलं आहे.
केंद्राने वादग्रस्त कायदे जरी मागे घेतले असतील तरी ते बिहारमध्ये दहा वर्षांपूर्वी लागू झाले होते. त्यात कृषी बाजारची व्यवस्था नाही. आता शेतकऱ्यांचे पुढील आंदोलन बिहार मधून सुरू होणार असून तिथे सत्ता बदल झाला आहे. बिहारमध्ये गेलो तेव्हा नितीश कुमार यांच्याशी आम्ही चर्चा केली होती. भाजपचा हात सोडा नाही तर त्यांना सत्ता गमवावी लागेल आणि महाराष्ट्र मध्ये जसं भाजपने शिवसेना फोडली तसं बिहारमध्येही होऊ शकेल. यानंतर त्यांना उद्धव ठाकरे यांच्यासारखा संघर्ष करावा लागेल असं नितेश कुमार यांना समजावून सांगितलं होतं. यानंतर बिहार मध्ये राजकीय घटनाक्रम झाला, असं टिकैत यांनी म्हटलं आहे.
दिल्लीच्या वेशीवर वर्षभर झालेल्या शेतकरी आंदोलनातील प्रत्यक्ष अनुभव ‘’व्हेन फार्मर्स स्टुड अप: हाऊ द हिस्टोरिक किसान स्ट्रगल इन इंडिया अनफोल्डेड’’ या पुस्तकात मांडले आहेत. हे पुस्तक अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी लिहिलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशाच्या कार्यक्रमांमध्ये सोमवारी राकेश टिकैत, डॉक्टर दर्शन पाल, हन्नान मौला आधी यांचा सहभाग होता.
दरम्यान, देशात लोक केंद्रातील सरकार वर नाराज आहेत, असं टिकैत त्यांनी सांगितलं आहे. रेल्वे कर्मचारी असेल पोलीस असतील अगदी न्यायाधीश सुद्धा दुःखी आहेत. मात्र उघडपणे ते बोलत नाहीत, असं टिकैत म्हणाले. पूर्वी राजकीय पक्ष फोडले जात होते आता भाजप शेतकरी संघटना फोडू लागले आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यांमध्ये भाजपच्या फोडाफोडीचा राजकारण रोखण्यासाठी रणनीती आखावी लागणार असल्याचं टिकैत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
Login to your account below
Fill the forms below to registerPlease enter your username or email address to reset your password.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares