वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
रविवार २८ ऑगस्ट २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 01:39 PM2022-03-09T13:39:44+5:302022-03-09T14:38:25+5:30
कारंजा (घाडगे) ( वर्धा) : शेतात बकऱ्यांसाठी चारा आणण्यास गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना आज (दि. ९) दुपारी १२ च्या सुमारास कारंजा घाडगे तालुक्यातील कन्नमवार ग्राम येथे घडली. 
लक्ष्मण महादेव हुके(३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी बकऱ्यांकरिता चारा आणण्यासाठी गावानजीकच्या तलाव रस्त्यावर असलेल्या शेतात गेला होता. शेतामधील गव्हाच्या पिकात असलेला हिरवा चारा कापत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला व त्याला दूरपर्यंत ओढत नेले. यावेळी शेतकऱ्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावले असता वाघ पळून गेला. परंतु तोपर्यंत लक्ष्मणचा मृत्यू झाला होता. लक्ष्मणला म्हातारे आई-वडील पत्नी दोन मुले असून त्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठं संकट कोसळलं आहे.
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares