Gadchiroli : मेडिगड्डा प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक, बॅक वॉटरमुळे शेतजमिनीचं नुकसान – ABP Majha

Written by

By: रोमित तोंबर्लावार, एबीपी माझा | Updated at : 24 Aug 2022 10:05 PM (IST)
Edited By: अभिजीत जाधव
Gadchiroli Medigadda Protest
गडचिरोली : जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरच्या मेडिगड्डा महाकाय सिंचन प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता तेलंगणा सरकारशी संगनमत करून गडचिरोलीत मेडिगड्डा सिंचन प्रकल्प राबवल्याने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट ओढविल्याची या शेतकऱ्यांची भावना भावना आहे. यंदा आलेल्या महापुरासाठी हा प्रकल्प कारणीभूत असल्याचं सांगत आज शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. 
गडचिरोलीच्या सीमेवर असलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्प आणि त्याच्या बॅक वॉटरमुळे सिरोंचा तालुक्यातील 20 गावांमधील शेत जमीन नापिक झाल्याचं दिसून येतंय. या परिसरात सतत पाणी राहत असल्याने शेतीतील उत्पन्न घटल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शेतीतून येणारे उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गोदावरी नदीच्या प्रवाहामुळे शेतीचे रूपांतर नदीमध्ये झाल्याचं यंदा दिसून आलं. या वेळच्या महापुरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्या, तसेच बॅक वॉटरमधील जमीन तातडीने भूसंपादित करा यासह अन्य मागण्यांसाठी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन केलं.
गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरच्या मेडिगड्डा महाकाय सिंचन प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. सिरोंचा येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आज शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता तेलंगणा सरकारशी संगनमत करून सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट ओढविल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त केली. 
मेडिगड्डा सिंचन प्रकल्प आणि त्याच्या बॅकवॉटरमुळे सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली, मुगापूर , मद्दीकुंटा, नगरम, चिंतलपल्ली, कासरपल्ली, गुमलकोंडा, सोमनूर, आसरअल्ली, अंकीसा आदी 20 गावांमधील शेत जमीन नापिक झाली आहे. शेतीत  सतत पाणी राहत असल्याने शेतीतील उत्पन्न समाप्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे यंदा पूरस्थिती भयावह झाली होती. या वेळच्या पुरात सिरोंचा शहर चारही बाजूने पाण्याने वेढलेलं होतं. मेडीगड्डा महाबंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सिरोंचा येथे बॅकवॉटरची स्थिती निर्माण झाली. तर दुसरीकडे वैनगंगा- प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या परिसरातल्या लोकांना पूर परिस्थितीला सामोरं जावं लागलं.
यंदाच्या पुरात गडचिरोली जिल्ह्यातील 40 गावातील नागरिकांना स्थलांतर करावं लागलं. त्यातील 34 गावे सिरोंचा तालुक्यातील होती.
हत्त्वाच्या बातम्या: 
 
 
Vidarbha Rain : विदर्भात पावसाचा जोर ओसरला, आलापल्ली-भामरागड मार्ग वाहतुकीसाठी खुला, भंडाऱ्यातही पुराचा धोका टळला
भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत पूरस्थिती कायम; अनेक मार्ग अजूनही बंद, अनेकांचं स्थलांतर
Rain Alert : राज्याला पावसानं झोडपलं; मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Update : गडचिरोलीत पूरस्थिती, तर मुंबईत तुरळक पावसाची हजेरी; वाचा पावसासंदर्भातील अपडेट
Highway Accident : उभ्या ट्रकला बोलेरोची धडक, चार जणांचा जागीच मृत्यू
Amit Shah Mumbai Tour : दर्शन बाप्पांचे घेणार, रणनीति मुंबई महापालिकेची आखणार? अमित शाह मुंबई दौऱ्यावर
Crime News: आयपीएस अधिकाऱ्यानंतर हॅकर्सकडून फसवणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या फोटोचा वापर
PM Modi : येणारं वर्ष बाजरी वर्ष! पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांनो तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा 
Temperature In Kolhapur : पाऊस थांबला, पण ऑगस्ट संपण्यापूर्वीच कोल्हापूर जिल्हा तापू लागला!
आता काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर पंढरपुरात नियोजन; मॉडेल जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची वाराणसी वारी

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares