Maharashtra News Live Update : सध्याचे मुख्यमंत्री हे रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री; शंभूराज… – TV9 Marathi

Written by

| Edited By: महादेव कांबळे
Aug 28, 2022 | 8:27 PM
शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नागपूर विद्यापीठात घेतली मिटिंग
कुलगुरू सह सिनेट मेम्बर होते उपस्थिती
विद्यापीठा संदर्भात प्रश्न आमदार प्रवीण दटके यांनी विधानपरिषद मध्ये विचारला होता त्यावर मी सांगितलं होतं मी प्रत्यक्षात येऊन परिस्थिती बघेल
त्यांची तक्रार होती एमकेसीएल या सॉफ्टवेअर कंपनी मुळे निकाल उशिरा लागत आहे.
त्या संदर्भात खूप कंप्लेंट आहेत मात्र आता फक्त तेवढ्यापुरता निर्णय घेतला
एमकेसीएल ला सस्पेंड करायचं आणि जी आधीची सॉफ्टवेअर कंपनी होती तिला सहा महिने एक्सटेन्शन द्यायच
तोपर्यंत केंद्र सरकारने डेव्हलप केलेलं एक सॉफ्टवेअर येईल ज्याचा एक रुपये आहे विद्यापीठाला द्यावा लागणार नाही
हे का झालं याची चौकशी समिती नेमलेली आहे
ती समिती पुढच्या आठवड्यापासून काम करेल आणि बाकी काही कंप्लेंट्स आहे त्या सगळ्या ऐकून घेऊ
विशेषता परीक्षांचे निकाल उशिरा लागले यामागे कोणाची भूमिका आहे हे तपासून त्यावर कारवाई होईल
यंदा पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती पंचकेदारेश्वर मंदिरात होणार विराजमान
पंचकेदारेश्वर मंदिराचं काम अंतिम टप्प्यात
मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई
येणाऱ्या पुणेकरांच लक्ष वेधून घेतंय पंचकेदारेश्वर मंदिर
शिवाजी रस्त्यावर उभारलं भव्य मंदिर
आरोग्यमंत्री तानाजी सावंत अँक्शन मोडवर
ग्रामीण भागातील रुग्णाच्या तक्रारीनंतर तानाजी सावंत थेट ससून रुग्णालयात
ससून रुग्णालयातील प्रशासनाला धरलं धारेवर
आरोग्य सुविधा देता की केबिनमध्ये बसता अधिकाऱ्यांना विचारला सवाल
ससून रुग्णालयात दिली अचानक भेट
सगळ्या अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवकांची घेतली झडती
पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार वेळेत मिळत नाहीत रुग्णानं केलं होती तक्रार !
आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या नगरसेविका सपना ठाकूर यांची राष्ट्रवादीत घरवापसी…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..
यापूर्वी सपना ठाकूर यांनी युवा स्वाभिमान कडून लढवली होती निवडणूक..
मी अजून असे ३, ४ खंड काढणार
खंडाचा आकर्षक काम करणारा हा प्रकाशक
मला आनंद झाला आहे
हे वाजवणारे माझे मित्र आहेत त्यांचं नाव पचांगे एका अंगावर त्यांचं भागत नाही म्हणून ते पाचंगे
माझ्या पत्नीचं लिखाणात मोठं नाव आहे
फ. मु शिंदे यांनी सादर केल्या कविता
मी पण एकदा निवडणूक लढवली होती कलंनुरी ला
लोकांनी मला विचारलं की का लढवली मी लोकांना सांगितल मी लोकप्रिय कवी आहे म्हणून निवडणूक लढली
उभा राहिल्या शीवय नाही की आपण किती लोकप्रिय आहोत
– फिरकी घेणं माणस जोडणे हे त्याच काम अखंड पणे सुरू आहे
– ते ७५ त आहे अस वाटत नाही ते ४५ आहे अस वाटत
साहित्यिक माणूस याच खुप वेगळं नातं असत,खेडोपाडी लोकांना खूप माहिती असत
पवार यांनी सांगितला गदिमा आणि पू ल यांच्या सोबतचा खिस्सा कवी लेखक काय करतात
फमुच लिखाण सहजपणा
त्याच्या मनात अस्वस्थता वाटते,समाजातील मोठा वर्ग वंचित राहत असेल यामुळं त्याबाब मन्स्ट अस्वस्थता पाहिला मिळतेय,ते त्याच्या लिखाणातून कळत
ते शेती शेतकरी याचा विषय मनात असेल त्यामुळं लिहतात पण आता समाजातील चित्र अस्वस्थ आहे,विचार बदलून क्रांती होत नसेल तर काय उपयोग अस वाटत असेल लिहून
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर..
राष्ट्रवादी काँग्रेसची आज अमरावतीत दोन संवाद बैठक..
अमरावती शहर व अमरावती ग्रामीण च्या संवाद बैठकीला जयंत पाटील राहणार उपस्थित…
आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची संवाद बैठक..
पुण्यातील मंडई, तुळशीबाग ग्राहकांच्या गर्दीने फुलली
गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी
गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांचा उत्साह
महात्मा फुले मंड ईत ग्राहक खरेदी करण्यासाठी आलेत
आज रविवारची सुट्टी गणेशोत्सवा पूर्वी पुणेकरांची बाजारात गर्दीआणि तीन दिवसांवर येऊन ठेपलेला
गणेशोत्सव त्यामुळे पुणेकर खरेदीसाठी घराबाहेर
पुण्यातील मंडईत खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी
दोन वर्षानंतर साजरा होतोय निर्बंधमुक्त गणेशोत्सव
तुळशीबाग आणि भोरीआळीदेखील पुणेकरांनी भरली फुल्ल
– सोलापुरात मोहीत कंबोज यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन
– मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवारांवर विविध ट्वीट केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक
– सोलापुरातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी आक्रमक
– सोलापुरातील चार हुतात्मा स्मारकासमोर केले जोडेमारो आंदोलन
– मोहित कंबोज विरोधात घोषणाबाजी
सोलापूरमधील चिकर्डे गावच्या दिव्यांग मुलीचे मृत्यूमुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी चिकर्डे गावात दाखल
– दिव्यांग निधीसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा दावा
– ग्रामस्थांच्या तीन मागण्या आहेत त्यामध्ये मृत मुलीचा छोटा भाऊ आहे त्याचे पालकत्व घ्या
-संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
-मृत मुलीच्या कुटुंबीयांना आपत्कालीन मदतनिधी मिळावी अशा मागण्या आहेत
– यातील दोन मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत मात्र गुन्हा दाखल करण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पुढील कारवाई करणार
– मुलीचा मृत्यू उपोषणादरम्यान झाला की नाही याबाबत तपास करुन पुढील कारवाई
चांदणी चौक उड्डाणपुला जवळील सेवा वाहिन्या काढण्याचे आवाहन
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील अस्तित्वात असणारा पुणे (बावधन) एनडीए-मुळशी उड्डाणपूल तोडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधणे प्रस्तावित
पाणी पुरवठा, टेलीफोन, विद्युत वाहिनी, ओएफसी केबल्स आदी सेवा वाहिन्या संबंधितांनी 10 सप्टेंबर पर्यंत स्व-खर्चाने काढून घेण्याचे आवाहन
जळगाव राष्ट्रवादीचे प्रतोद व मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार यांची शाब्दिक चकमक एकमेकांशी भिडले
शरद पवार यांच्या चिन्हावर निवडून येणारा
राष्ट्रवादीशी पंधरा दिवसात गद्दारी करणारा हा गद्दार मला काय सांगणार वफादारी काय असते ते
राष्ट्रवादीचे अनिल पाटील अशा अज्ञानी व कमकुवत असलेल्या माणसांविषयी काय बोलावं
अनिल भाईदास पाटील हा डुप्लिकेट माणूस ओरिजनल झाला
त्यांना जिल्हा नेता होण्याची घाई झाली आहे
आधी आपला मतदार संघ सांभाळा मगच जिल्ह्याचे स्वप्न बघा
तुमची कुवत पाहूणच बोला
कळंबोली परिसरातील वाहतूक पोलिसांची गुंडगिरी समोर
कळंबोली परिसरात सिंगल झेब्रा क्रॉस करून दुचाकीस्वाराला वाहतूक हवालदाराने दादगिरी करत रस्तात लोळूण मारहाण
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
तळोजा परिसरातील पनवेल मुंब्रा रोडा वर झालेली घटना
सातारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वरमधुन पुण्याकडे रवाना
मुखमंत्र्यांचा तीन दिवसांचा खासगी दौरा संपला
मुख्यमंत्री बाय कारने पुण्याकडे रवाना
पुणे
आदित्य ठाकरे यांचा पुणे दौरा अजून ठरलेला नाही
पण अमचा दौरा गुपीत नसेल
आणि घर ते कार्यालय कार्यालय ते घर असं नसेल
नीलम गोऱ्हे यांची टीका
अमरावती जिल्ह्यात एसटी बसमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा दारूच्या नशेत धिंगाणा
बस वाहकालाही अश्लील शिवीगाळ.
अमरावती-दर्यापूर मार्गावरील खोलापूरमधील धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
मद्यपी पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय बेलसरे असे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव
कराड
सध्याचे मुख्यमंत्री हे रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना हवाई सफर आवडत नाही
शंभूराज देसाई यांचा नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला
कोल्हापूर
किणी टोल नाक्यावरील आंदोलनाप्रकरणी मनसेच्या राजू जाधव 18 जणांवर गुन्हा दाखल
पेठ वडगाव पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल
मुदत संपलेला किणी टोल नाका तात्काळ बंद करावा या मागणीसाठी मनसेनं केल होतं आक्रमक आंदोलन
24 ऑगस्टला आंदोलना दरम्यान पोलिसांनी राजू जाधव प्रमुख कार्यकर्त्यांची केली होती धरपकड
आमची तक्रार आहे 10  वाजता लाऊड स्पीकर बंद करतात
रेल्वेचा 175 डेसिब्बल आवाज असतो
रेल्वेला नोटीस द्या
जर हे थांबवलं गेलं नाही तर दहा नंतर जाणारे प्रत्येक मेल आम्ही थांबवू
सांगली महापालिकेच्या कार्यशाळेत 70 जणांनी बनवल्या शाडूच्या गणेशमूर्ती
आमराईत शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याच्या उपक्रमास मोठा प्रतिसाद
येणारा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि हरित साजरा करावा आयुक्त सुनील पवार यांचे जनतेला आवाहन
मुंबई..
स्वाभिमानी चर्मोद्योग कामगार संस्थाचे पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत केला प्रवेश.
स्वाभिमानी चर्मोद्योग कामगार संस्थाचे पदाधिकारी आपल्या अनेक समस्या घेऊन उद्धव ठाकरेंची घेतली भेट
तर इतर ही काही शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहचले
221 स्वाभिमानी चर्मोद्योग कामगार संस्थाचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी चर्मोद्योग कामगार संस्थेच्या सरचिटणीस भगवान सखाराम नारकरांनी घेतली भेट, गोरख गायकवाड
संगमनेर –
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नागरी सत्कारावेळी पेढेतूला पार पडली
कार्यक्रम संपल्यावर पेढे घेण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड
पेढ्यासाठी मोठा गोंधळ उडाला….
तालुक्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संगमनेर तालुक्यात शत- प्रतिशत भाजपला आणायच
पंचायत समिती , नगरपालिकेवर पहिले झेंडा
त्यानंतर आमदारकीवर
राधाकृष्ण विखे पाटलांची मविआवर जोरदार टीका…
पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडला जाणार
12 ते 15 सप्टेंबर दरम्यान पूल पाडणार
पूल पाडण्याची ऑर्डर प्रशासनाने काढली
स्वतः मुख्यमंत्री चांदणी चौकात कामाचा आढावा घेणार
मुख्यमंत्र्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्यानंतर प्रशासन अँक्शन मोडवर
नवी मुंबईत भटक्या कुत्र्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहेत
सिवूड NRI कॉम्पलक्स परिसर येथील एका महिलेला भटका कुत्रा चावला
ही महिला जात असताना अचानक मागून या कुत्र्याने चावा घेतला आहे
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली
मात्र पुन्हा एकदा नवी मुंबईत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न उभा राहत आहे
संगमनेर / अहमदनगर
माझे कुटूंब तूमची जबाबदारी असे मुख्यमंत्री
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विखे पाटलांची टीका
तीन तीन मंत्री जिल्ह्यात मात्र काम नाही
ज्याला इच्छामरण हवे त्याने घुलेवाडीच्या आरोग्य केंद्रात जावे
बाळासाहेब थोरातांवर टीका
संगमनेर –
संगमनेरमध्ये भाजपच्या नेत्याचं पहिलाच असं भव्य स्वागत
महापुरूषांना पुष्पहार घातला , दर्गा आणि देवांचे दर्शन.
आपण पारंतत्र्यात होतो अस वाटत होतं मात्र आता स्वातंत्र्यात आहोत अशी भावना तालुक्यातील जनतेची झाली
जागितक पातळीवर मोदींचे कौतूक होतं
मागील अडीच वर्षात राज्यात काही घडल तर केंद्राकडे बोट दाखवायचे
मविआचे मंत्री काय करत होते, ते काय भजे तळत होते ?
महाभ्रष्ट्राचारी सरकार कधी पाहिल नव्हत
विखे पाटलांची मविआवर टीका…
संगमनेर / अहमदनगर
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची पेढे-तूला
पुष्पहार घालुन भव्य‌ सत्कार
कार्यकर्त्यांची विखे पाटलांच्या सत्कारासाठी मोठी गर्दी…
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे शक्ती प्रदर्शन
माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयासमोर भव्य सत्कार
क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार घालून जंगी स्वागत
मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित
आज विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार
ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक….
उद्धवसेनेतील दोन आमदार फुटणार,मंत्री संदीपान भूमरेंची माहिती
उद्धव ठाकरे गटातील 2 आमदार फुटून लवकरच एकनाथ शिंदे गटात येणार
कारखान्याच्या स्लिप बॉय भूमरेला आम्ही मंत्री केले असे उद्धव ठाकरे गटाकडून वारंवार येत होते सांगण्यात..
उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी मंत्री संदीपान भुमरे यांनी दोन आमदार शिंदे गटात येणार अशी दिली माहिती..
मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या असल्याने विरोधकांनी केली होती टीका..
नाशिकच्या आर्टिलरी सेंटर या प्रतिबंधित क्षेत्रावर ड्रोन उडवल्याचे प्रकरण
आर्टिलरी प्रशासनाकडून एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
प्रकरणाची आणखी चौकशी सुरू
हलगर्जीपणा केल्याचा अधिकाऱ्यांवर ठपका
गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आठशे फूट उंचावर काही मिनिटे उडाला ड्रोन
ड्रोन पाडण्याच्या तयारीत असतांनाच ड्रोन कॅमेरा गायब
आर्टिलरी सेंटरमधील अधिकाऱ्याने तक्रार देताच उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोलापूर येथील पीडित कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी भेट घ्यावी आणि पीडीत कुटुंबाला 20 लाखाची मदत जाहीर करावी.
– तसेच ज्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा.
– आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांची मागणी
– सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चिकर्डे या गावात दिव्यांग मुलगी वैष्णवी कुरुळे निधीसाठी उपोषणास बसली होती
– परंतु त्याच दरम्यान या दिव्यांग मुलीचा मृत्यू झाला असल्याचा मुलीच्या आई वडिलांचा आरोप
– त्यामुळे या घटनेची दखल सरकारने घेतली असती तर या दिव्यांग मुलीचा जीव वाचला असता
कर्नाटक हिजाब प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
न्या. हेमंत गुप्ता आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर एकूण 24 याचिका
महिलांसाठी हिजाब घालणे हा इस्लामचा अनिवार्य भाग नसल्याचा हायकोर्टाचा निर्णय
शाळा-कॉलेजमध्ये गणवेशाचे पालन करण्याचा राज्याचा आदेश योग्य – हायकोर्ट
पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड शहरात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवशी मोबाईल हिसकावून नेल्याचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. गर्दीचा फायदा घेत,पत्ता विचारण्याच्या बहाण्याने, दुचाकीवरून येऊन अचानक मोबाईल हिसकवणे, मोबाईल वर बोलणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकवणे अशी या चोरांच्या चोरीची पद्धत आहे.
मुंबई : शिवसेना चांदिवली विधानसभा विभागाच्या वतीने, आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता या कावडयात्रेला सुरुवात होणार आहे. काजूपाड शितल तलाव ते शंभु महादेव मंदिर असा या कावड यात्रेचा मार्ग असणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश लागू
दि. 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश
जमावबंदीदरम्यान निदर्शने, मोर्चा, आंदोलन करण्यास मनाई
पोलिसांची परवानगी घेतल्यानंतरच काढता येणार मिरवणूक
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचे आदेश
अरविंद सावंत, भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती
तर शिवसेना नेते लीलाधर डाके यांचे चिरंजीव पराग  डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्त्यांची घोषणा
चंदगड तालुक्यातील कुदनूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. काल सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे रस्त्यांना नाल्याचं स्वरूप प्राप्त झाले होते. रस्त्यातून वाट काढताना शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. नदी नाल्यांना पूर आला
विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर
पहाटे सहा वाजल्यापासून अजित पवरांकडून विकासकामांची पहाणी
सकाळी 9 वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये होणार जनता दरबार
आज दिनांक 28 ऑगस्ट 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. आज  देखील काही महत्त्वाच्या  राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या पावसाने विश्रांती दिली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाने विश्रांती दिल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता इथून पुढे खसगी वाहनांवर महाराष्ट्र शासन असा फलक लावून गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत परिवहन आयुक्तालयाकडून आदेश देण्यात आले आहेत. खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिणाऱ्यांवर राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे आदेश परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत . या आधी खासगी वाहनांवर पोलीस असे लिहिल्यास कारवाई करण्यात येत होती.
Published On – Aug 28,2022 6:52 AM
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares