Women Shirt Button: 'या'मुळे महिलांच्या शर्टचे बटन डावीकडे असते; जाणून घ्या यामागील खास कारण – Times Now Marathi

Written by

Women Shirt Button Left Side । मुंबई : आजकाल फॅशनचे युग आहे. सध्या युनिसेक्स फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहे. युनिसेक्स म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनीही वापरलेली फॅशन. आजकाल पॅंट, शर्ट पुरुष आणि स्त्रिया दोघेही परिधान करतात. तसेच कपड्यांवरील योग्य चष्मा याशिवाय अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महिला आणि पुरुषांसाठी समान आहेत. पूर्वी फक्त पुरुषच शर्ट घालायचे पण आता महिलाही शर्ट घालू लागल्या आहेत. फॅशनच्या या युगात बरेच काही बदलले आहे परंतु काही पारंपारिक गोष्टी आहेत ज्या अजूनही तशाच आहेत. (this causes the button of a woman’s shirt to be on the left). 
दरम्यान, महिला आणि पुरुषांच्या शर्टमध्ये खूप फरक पाहायला मिळतो. पुरूषांच्या शर्टला उजवीकडे बटणे असतात तर महिलांच्या शर्टला डावीकडे बटणे असतात. लक्षणीय बाब म्हणजे ही फॅशन नसून त्यामागे अनेक कारणे आहेत. चला तर म जाणून घेऊया यामाहील काही खास कारणे. 
अधिक वाचा : वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीने आणलेल्या दोन मुलींची सुटका
पूर्वीच्या काळातील पुरूष उजव्या बाजूला तलवार ठेवत असत. त्यामुळे जेव्हा त्यांना शर्टची बटणे काढायची किंवा लावायची तेव्हा ते डाव्या हाताचा वापर करायचे. जर शर्टची बटणे डाव्या हाताने उघडायची असतील तर शर्टची बटणे उजव्या बाजूला असावीत यामुळे सोपे होते. 
महिला आपल्या मुलाला डाव्या बाजूला धरत असत. त्यामुळे शर्टाचे बटण काढण्यासाठी त्यांना उजव्या हाताचा वापर करावा लागतो. उजव्या हाताने बटण उघडण्यासाठी, बटण डावीकडे असले पाहिजे. म्हणूनच महिलांच्या शर्टला डाव्या बाजूला बटणे असतात.
असे म्हटले जाते की नेपोलियन बोनापार्टने महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला लावण्याचा आदेश दिला होता. नेपोलियन नेहमी त्याच्या शर्टमध्ये एक हात ठेवत असे. स्त्रिया नेपोलियनचे अनुकरण करू लागल्या. म्हणूनच नेपोलियनने स्त्रियांच्या शर्टला डावीकडे बटणे लावण्याचा आदेश दिला. मात्र याचा कोणताही ठोस पुरावा नाही.
पूर्वी स्त्रिया दोन्ही पाय एका बाजूला ठेवून सायकल चालवत असत असे म्हणतात. शर्टच्या डाव्या बाजूला बटणे असल्यामुळे त्यांना खूप मदत मिळायची. महिलांच्या शर्टला उजव्या बाजूला बटण लावले तर वाऱ्यामुळे त्यांचा शर्ट पुन्हा पुन्हा उघडायचा त्यामुळे त्यांना समजात वावरताना संकोच वाटायचा. 
काही लोक म्हणतात की महिलांच्या शर्टमध्ये डावीकडे बटणे लावण्याचे एकमेव कारण म्हणजे महिला आणि पुरुषांच्या कपड्यांमध्ये फरक आहे.

 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares