गडचिराेली : जंगलात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
आरमाेरी : गडचिराेली आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा गट ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सालमारा येथील अत्पभुधारक शेतकरी शंकरनगर जंगलातील कक्ष क्रमांक ४७ येथून सायकलने जात हाेता. येथील नाल्याला पूल नसल्यामुळे सायकलवरून उतरुन पायी जात असताना रस्त्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना साेमवारी (ता. २९) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. साेमवारी सकाळच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील सालमारा येथील अत्पभुधारक शेतकरी बळीराम कोलते (वय ४७) काही कामानिमित्त सालमारा येथून शंकरनगर कच्च्या रस्त्याने जंगलातून सायकलीने जात असताना जंगलालगत नाल्याला पुल नसल्यामुळे सालकलवरून उतरून पायी जात असताना रस्तेच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने हला करून ठार केले.
ही माहिती सरपंच संदीप ठाकुर, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम, अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियनचे अमोल मारकवार यांना मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठून पाहणी केली व वनविभागाचे अधिकारी वेळेवर उपस्थित न झाल्याने घटनास्थळीच ठिय्या आंदोलन करण्यात आले. जो पर्यंत अधिकारी येऊन मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत मृतदेह वनविभागाच्या ताब्यात देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने बराच काळ वातावरण चिघळल्यामुळे आरमोरी वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम यांनी पोलिसांना पाचारण केले.
मृताच्या कृटुबियांना अंत्यविधीसाठी जागेवर ५० हजार रुपये द्यावे, सानुग्रह अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी संरक्षण द्यावे, वाघाचा बंदोबस्त तत्काळ करावा, अशा मागण्या केल्या होत्या. सहायक वनसंरक्षक चव्हाण यांनी या मागण्या मान्य केल्याने वातावरण निवळले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अधिक तपास सहायक वनसंरक्षक चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, पोलिस निरीक्षक मनोज काळबाधे, क्षेत्र सहायक गाजी शेख, राजू कुंभारे, वनरक्षक करकाडे, वनरक्षक गेडाम करीत आहेत
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares