गोतोंडीत अस्तरीकरणविरोधात आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
निमगाव केतकी, ता.२९ : गोतोंडी (ता. इंदापूर) येथे नीरा डावा कालवा अस्तरीकरणाच्या विरोधात आज (ता.२९) इंदापूर -बारामती रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. कालव्याचे बळजबरीने अस्तरीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास कोर्टात दाद मागू, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास शेकडो शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेस मोठा फटका बसणार असल्याने ग्रामपंचायत व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागास रस्ता रोको आंदोलन आंदोलनाचा इशारा दिला होता.
अस्तरीकरणाच्या कामास शेतकऱ्यांचा विरोध वाढत चालला असून आहे. यावेळी बोलताना निवृत्त कृषी अधिकारी विठ्ठल पापत म्हणाले, या भागात पाऊस कमी पडतो म्हणून ब्रिटिशांनी त्याकाळी कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी दिले. कालव्याच्या पाझरावर शेतकऱ्यांचा पूर्ण हक्क आहे आणि सध्या त्यावर गदा आणण्याचे काम केले जात आहे. हे काम जर बळजबरीने करण्याचा प्रयत्न केला तर या विरोधात शेतकरी कोर्टात जाऊन दाद मागतील हे सरकारने लक्षात घ्यावे.
सरपंच गुरुनाथ नलवडे म्हणाले, की शेतकऱ्यांना विचारत न घेता अस्तरीकरणाचा निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे. या विरोधात शेतकरी पेटून उठला आहे याची शासनाने तातडीने दखल घ्यावी
यावेळी कर्मवीर कारखान्याचे माजी संचालक दिनकर नलवडे, अप्पासाहेब मारकड, कुंडलिक नलवडे, प्रहार संघटनेचे विशाल कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा कांबळे यांनी अस्तरीकरण्याच्या विरोधात तीव्र भूमिका मांडली.
यावेळी उपसरपंच परशुराम जाधव, रामभाऊ काळे, रवी कांबळे, कैलास पाटील, शिवराम बनकर, संजय बिबे, आशा नांगरे, गजराबाई जाधव, सुवर्णा कांबळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाखा अभियंता आर. डी. झगडे, मंडल अधिकारी शहाजी राखुंडे व तलाठी प्रशांत कांबळे यांनी निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे व पोलिस पाटील राजश्री खाडे यांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.
01315
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares