परभणीतील कृषी कार्यालयात गोंधळ आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
परभणी: मानवत येथील बनावट औषध प्रकरणातील आरोपी यांच्यावर कृषी कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत व गुणवत्ता चाचणीत निकृष्ट आढळलेल्या कंपनीच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालावी या मागणीसाठी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने सोमवारी (ता.२९) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सोमवारी गोंधळ आंदोलन करण्यात आले.
परभणी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या तणनाशक बियाणे खते औषधी खरेदी केल्यानंतर त्यांचा उपयोग होत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. नामांकित कंपनीचे औषध वापरूनही त्याचा फारसा फायदा होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. अशावेळी नामांकित कंपनीची बनावट औषधी बाजारात विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून ता. ९ ऑगस्ट रोजी बनावट माल पकडून कृषी विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हे दाखल झाले असून पोलीस तपासात अनेक व्यापारी यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बनावट औषधांचा हा माल परभणी जिल्ह्यात पकडण्यात आला होता. याचा अर्थ तो विक्रीसाठी आलेला होता. यापूर्वीही अनेक व्यापाऱ्यांना माल पुरवलेला असून तो शेतकऱ्यांना विक्री झालेला असणार आहे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले असताना असा प्रकार शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे असे शेतकरी बचाव कृती समितीचे संघटक सुनील बावळे यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील सहभागी असणाऱ्या व्यापाऱ्यांवर कृषी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, बनावट औषधी निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या औषधी, खते, बियाणे यांचे गुणवत्ता चाचणी घेणे द्यावी, गुणवत्ता चाचणीत निकृष्ट आढळलेल्या कंपनीच्या सर्व उत्पादन विक्रीवर तात्काळ बंदी आणावी आदी मागण्या या गोंधळ आंदोलनात करण्यात आल्या.
कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने गोंधळ कलावंत आणून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर सुनील बावळे, अर्जुन पंडित, रामप्रसाद बोराडे, मारुती साठे, त्रिंबक शेळके, शिवाजी सोनवणे, गणेश देशमुख, रमेश लोखंडे, दीपक गुळवे, उद्धव शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares