आंदोलनाचा इशारा: शहाजी पाटलांच्या सांगोल्यातील शेतकरी म्हणाले, ‘रेल्वे नाॅट ओके’ – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
राज्यातील सत्तांतरकाळात ‘काय ते हाटेल … ओक्के’ या संवादामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील चर्चेत आले. ते राजकीयदृष्ट्या ओके झाले असले तरी त्यांच्या मतदारसंघातील शेतकरी रेल्वे मंत्रालयाविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. नाॅट ओके, असा सूर लावत आहेत.
कोरोना संकटकाळात शेतकऱ्यांना देशाच्या कानाकोपऱ्यात माल पाठवता यावा म्हणून मोदी सरकारने किसान रेल्वे सुरू केली होती. १३ एप्रिलपासून कोळशाचा तुटवडा असे कारण पुढे करून ती बंद करण्यात आली. कोरोना संकट टळल्याने वाहतुकीचे सर्व मार्ग खुले झाले आहेत. म्हणूनही किसान रेल्वे बंद केली असावी असे दिसते. पण यामुळे एक चांगली सुविधा हातातून गेल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. त्यांनी ‘काय ती रेल्वे.. काय ते डीआरएम.. नॉट ओके’ असा डायलॉग मारत रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. बाजारपेठेतील वेळेचे गणित साधण्यासाठी शेतकरी ज्यादा दराने ट्रान्सपोर्टने माल पाठवत आहेत. हे नुकसान टाळण्यासाठी रेल्वे सुरू करा, नाहीतर रेल्वे रोको आंदोलन करू, अशा इशारा शेतकऱ्यांनी एडीआरएम परिहार यांना दिला. त्यावर परिहार यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares