म्हासूर्ली येथील तीन एकरातील भात गव्यांच्या कडून फस्त – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
भातपिकाचा पाडला
गव्यांच्या कळपाने फडशा
म्हासुर्ली परिसरात धुडगूस; शेतकरी हवालदिल
धामोड, ता. २९ : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील सुमारे तीन एकरातील भात पिक गव्यांनी फस्त केले आहे. पंधरा ते वीस गव्यांच्या कळपाने पिकांचे नुकसान केले आहे. हातातोडांशी आलेली पिके गव्याच्या कळपाने संपवल्याने म्हासुर्ली परिसरातील शेतकरी हवालदिल आहे.
म्हासुर्ली व झापाचीवाडीजवळच असलेल्या शिवार नावाच्या शेतातील संजय अहमद मलकापुरे, जयबुन मोहिद्दीन मलकापुरे, तुकाराम लहू चौगले, कृष्णात चौगले, शिवाजी परिट आदी शेतकऱ्यांच्या सुमारे तीन एकराहून अधिक क्षेत्रातील भात पिक गव्यांनी फस्त करून नासाडी केली. परिसरातील भात पिक पोटरीला आले आहे. त्यामुळे गव्यांनी मोर्चा भात पिकाकडे वळवला आहे. हातातोंडाशी आलेले पिक गव्यांनी खाल्ल्याने शेतकऱ्यांसमोर समस्या निर्माण झाली आहे. शिल्लक पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्री पिकांची राखण सुरू केली आहे.
याबाबत म्हासुर्ली परिक्षेत्रचे वनपाल विश्वास पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून सर्वांना योग्य ती भरपाई देण्यात येईल, असे सांगितले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares