शिवसेना रेशन निवेदन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
46399

लोगो- अन्नधान्याच्या अनुदान योजना

‘ते’आदेश मागे न घेतल्यास आंदोलन
शिवसेनचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन
कोल्हापूर, ता. २९ ः अन्नधान्याच्या अनुदान योजनेतून बाहेर पडा. हा संपूर्णपणे ऐच्छिक निर्णय आहे. मात्र, पुरवठा विभागाच्या उपायुक्तांच्या सूचनेनुसार जबरदस्तीने अर्ज भरून घेण्याबरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्याचे आदेश काढले आहेत. ते मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिला.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने २०१६ मध्ये अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील लाभार्थ्यांकरिता स्वेच्छेची आहे. त्याची अंमलबजावणी सुरू असून, गरजवंतांना धान्य मिळावे. आवश्यकता नसलेल्यांना योजनेतून स्वेच्छेने वगळावे. हे धोरण आजपर्यंत राबविले जात आहे; पण तहसीलदारांनी उपायुक्तांच्या सूचनेनुसार काढलेल्या आदेशात जे कार्डधारक योजनेनुसार धान्याचा लाभ घेतात, त्यापैकी शासकीय, निमशासकीय नोकर, व्यावसायिक, किराणा दुकानदार, पेन्शनधारक, ट्रॅक्टर असणारे बागायतदार शेतकरी, मोठ्या कंपनीत काम करणारे, साखर कारखान्यात कायम असणारे कामगार, आयकर भरणारे, स्लॅबची बिल्डिंग असणारे, चारचाकी वाहनधारक (घरगुती व व्यावसायिक) यांनी ३१ ऑगस्टपर्यंत योजनेतून बाहेर पडण्याचा अर्ज स्वेच्छेने द्यायचा आहे. जे देणार नाहीत, त्यांची तलाठी व मंडल अधिकारी शहनिशा करून अपात्रांवर आजपर्यंत उचल केलेल्या धान्याची बाजारभावाप्रमाणे रक्कम वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, सुशील भांदिगिरे, अनिल पाटील, संजय जाधव, अवधूत साळोखे, विनोद खोत, पोपट दांगट, राजू यादव, प्रकाश पाटील, सतीश कुरणे, विराज पाटील, राहुल गिरुले उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares