Amravati : ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाचा होणार मेळघाटात शुभारंभ, मंत्री – ABP Majha

Written by

By: प्रणय निर्बाण, एबीपी माझा | Updated at : 30 Aug 2022 06:29 PM (IST)
Edited By: अभिजीत जाधव
अब्दुल सत्तार
अमरावती : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कृषी विभागाचे (Agriculture Department) पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” (Majha Ek Divas Majhya Balirajasathi) हा उपक्रम 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळघाटातील (Melghat) धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता होईल..
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे बुधवार 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता साद्राबाडी येथे आगमन होईल. यावेळी कृषीमंत्री हे साद्राबाडी येथील शेतकरी दत्तात्रय चुनीलाल पटेल यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यानंतर साद्राबाडी येथे 1 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता ‘माझ्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे पटेल यांच्या शेतावर उपस्थित राहून शेतीविषयक समस्या, अडचणी, प्रश्न जाणून घेतील. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता धारणी येथील पंचायत समिती समोरील परिसरात 10 हजार शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचा, तसेच ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी कार्यालयाचे शुभारंभ होईल. 


शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांमुळे निर्माण होणारा ताणतणाव, नैराश्य, शेतकरी आत्महत्या याची कारणमीमांसा करुन सुलभ आणि प्रभावी कृषी धोरण तयार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ (Majha Ek Divas Majhya Balirajasathi) या उपक्रमात प्रधान सचिव, कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, शास्त्रज्ञ, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक आणि इतर उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी भेट देण्याच्या सूचना आहेत. त्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस भेट द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Farmers Agitation : ओला दुष्काळ जाहीर करा, संत्र्याला हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या, स्वाभिमानीचे मोर्शीत रास्ता रोको आंदोलन
Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna : एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, चुकीच्या माणसाला लाभ मिळू नये ; कर्मचाऱ्यांना निर्देश
Amravati : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा विद्यापीठाचा दर्जा लवकरच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
Dahi Handi 2022 :  देवेंद्र फडणवीस आले आणि इशाऱ्याने वजनकाटा दूर करण्यास सांगितला, अमरावतीत रक्ततुला करण्यास नकार
साहेब आमच्याकडे लक्ष द्या; अमरावतीमधील कळमखार गावातील महिलांनी अडवला अजित पवारांचा ताफा
NCRB 2021 : देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये 19 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर काका-पुतण्याचा वाद रंगणार; जयदत्त क्षीरसागर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, आ. संदीप क्षीरसागर यांची मागणी
Ganesh Chaturthi: बेंगळुरूच्या चामराजपेट मैदानात गणेश चतुर्थीच्या पूजेला परवानगी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
In Pics : हाँगकाँगविरुद्ध टीम इंडिया सज्ज, मैदानात कसून करत आहेत सराव, पाहा PHOTO
Jharkhand Crisis: महाराष्ट्रानंतर आता झारखंडचं सरकार पडणार? आमदारांना रांचीवरून रायपूरला हलवलं; मुख्यमंत्री सोरेन म्हणाले…

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares