डॉ. मधुमती शिंदे यांचा सत्कार – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
46993
डॉ. मधुमती शिंदे यांचा सत्कार
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापिका डॉ. मधुमती शिंदे यांना ग्लोबल यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित केले. संशोधन आणि शिक्षण या विषयासाठी त्यांची पुरस्कारासाठी निवड केली. मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार दिला. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते सत्कार केला. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. टी. इंगळे, प्रा. डी. ए. यादव, मेजर मोहन वीरकर, डॉ. आम्रपाली कट्टी, प्रा. आरती खोत, प्रा. ऊर्मिला चौगुले आदी उपस्थित होते.
———-
46994
‘व्यंकटेश-बियाणी’मध्ये सामंजस्य करार
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालय व बियाणी टेक्नॉलॉजी कोल्हापूर या दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार केला. बियाणी टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना भेटी देऊन प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. तसेच विविध अभ्यासक्रम यासाठी पूरक सेमिनार कार्यशाळा घेण्यासाठी तज्‍ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध होणार आहेत. रोजगाराच्या संधी, माहिती तंत्रज्ञान आदी माहिती मिळणार आहे. अशा विविध बाबींवर हा करार केला. करारावर स्नेहल बियाणी, प्राचार्य डॉ. विजय माने, शारीरिक शिक्षण संचालक आमीन बाणदार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. करारावेळी कार्यालयीन अधीक्षक एस. एस. गायकवाड, ग्रंथपाल एम. पी. केसरकर आदी उपस्थित होते.
———-
46995
दि न्यू हायस्कूलचे यश
इचलकरंजी : आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या एनएमएमएस परीक्षेत दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने यश प्राप्त केले. आठवीचे अकरा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. तसेच एक विद्यार्थी सारथी संस्थेमार्फत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा खंजिरे शिक्षण संस्थेतर्फे सत्कार केला. संस्थेचे चेअरमन अरुण खंजिरे, व्हाईस चेअरमन बाळासाहेब मुरदंडे, मुख्याध्यापक एस. ए. पाटील आदी उपस्थित होते.
————-
46996
‘टागोर’च्या १७ जणांना शिष्यवृत्ती
इचलकरंजी : एनएमएमएस परीक्षेत महानगरपालिकेच्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनने शाळेने निकालाची परंपरा कायम राखली. सलग दुसऱ्या वर्षी शहरात अव्वल येण्याचा मान शाळेने पटकावला. एकूण १७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. शहरातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये विद्यानिकेतन शाळा सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असणारी शाळा ठरल्याचे सौ. अलका शेलार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक विद्याधर भाट, राजेंद्र घोडके, दिनेश पाखरे आदींचे मार्गदर्शन लाभले.
———–
46997
बालाजी विद्यालयाचे यश
इचलकरंजी : एनएमएमएस परीक्षेत श्री बालाजी माध्यमिक विद्यालयाने यश प्राप्त केले. १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. इतर १८ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. परीक्षेसाठी ८५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे, सचिव महेश कोळीकाल यांच्याहस्ते सत्कार केला. विद्यार्थ्यांना डी. पी. परीट, एस. जी. जाधव, डी. डी. माळी, सौ. ए. एम. दळवी, सौ. ए. एस. डाकरे, एस. एस. कांदेकर, गणेश कुमठेकर, सौ. प्रियंका चौगुले आदींचे मार्गदर्शन लाभले.
————-
रोटरीतर्फे गणेशोत्सव स्पर्धा
इचलकरंजी : रोटरी क्लब व इनरव्हील क्लबतर्फे यावर्षी गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. सार्वजनिक मंडळ व घरगुती गणेश भक्तांसाठी खुल्या पद्धतीने ही स्पर्धा असणार आहे. सार्वजनिक मंडळाच्या देखाव्यांचे परीक्षण प्रत्यक्ष जागेवर येऊन केले जाणार आहे. यामध्ये उत्कृष्ट मूर्ती, उत्कृष्ट कलात्मक देखावा, पौराणिक देखावा, ऐतिहासिक देखावा, समाजप्रबोधन अशी पारितोषिके दिली जातील. स्पर्धेत आरास व डेकोरेशनसाठी इकोफ्रेंडली साहित्याचा वापर करण्याचा आहे. घरगुती गणेश भक्तांसाठी मात्र ऑनलाईन फोटो अपलोड करावे लागणार आहेत. घरातील गणपती बाप्पांचे व डेकोरेशन पारंपरिक वेशभूषेचे आरती करतानाचे फोटो १० सप्टेंबरपर्यंत पाठवावे लागणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशभक्तांनी नावे रोटरी सेवा केंद्र दाते मळा येथे द्यावीत, असे आवाहन केले आहे.
————-
महेश लोहार यांची निवड
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा भारतीय कम्युनिष्ठ पक्षाच्या सहसचिवपदी महेश लोहार यांची निवड करण्यात आली. पक्षाचे जिल्हा अधिवेशन शाहू स्मारक येथे झाले. यात पक्षाचे राज्य सहसचिव सुभाष लांडे यांनी त्यांची निवड जाहीर केली. जिल्हा सचिवपदी सतीश कांबळे यांची फेरनिवड केली.
——–
महावितरणतर्फे समस्या निवारण शिबिर
इचलकरंजी : महावितरणकडून वीज ग्राहक समस्या निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ३) सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत मोठे तळे येथील महावितरण कार्यालयात हे शिबिर होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून होणाऱ्या या शिबीरात वीजेसंदर्भातील तक्रारी, वीज बिल दुरुस्ती, वीज मीटर जोडणे आदींबाबत निवारण होणार आहे. शहरातील महावितरणच्या उपविभाग अ अंतर्गत येणाऱ्या परिसरातील नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन तक्रारींचे निवारण करण्याचे आवाहन केले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares