मॅनेजमेंट फंडा: गणेश चतुर्थी म्हणजे अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी चालक! – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
आपले ऋषी-मुनी शास्त्रज्ञ होते आणि सनातन धर्माचा मूळ आधार विज्ञान आहे, असा आपल्यापैकी बहुतेकांचा विश्वास आहे. पण, माझ्यासारख्या काही लोकांना नेहमी वाटते की, ते महान अर्थतज्ज्ञही असावेत आणि गणेश चतुर्थी हा सण माझा याबाबतचा दृष्टिकोन सिद्ध करेल. लॉकडाऊनमध्ये नक्कीच आपण वेगळे झालो, पण आता सर्वात आवडत्या गणपतीला भेटण्यासाठी भाविक उत्सुक आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी रस्ते आणि बाजारपेठा भक्तांनी फुलून गेल्या आहेत. मुंबईही कमी उत्साह नाही. रस्ते फेरीवाल्यांनी फुलले आहेत. ते सांगतात, मुंबईकर पूर्वीपेक्षा किती तरी अधिक पटींनी उत्साहाने सण साजरा करत आहेत.
भारतातील बहुतांश सणांना रस्त्यावर खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असते, हे मी नेहमीच पाहिलं आहे आणि गणेशोत्सव हा सर्वात मोठा असतो, कारण तो सर्व संस्कृती-पंथांतील भेद दूर करतो. केवळ फूल विक्रेतेच नव्हे, तर छोटे सजावट करणारे, पूजेचे साहित्य विकणारे, गृहिणींनी तयार केलेले उकडीचे मोदक विकणारे मिठाईवाले, पूजा साहित्यासाठीच्या टोपल्या, लाल कापड, फळे-भाज्या आणि पुजाऱ्यांचाही हा हंगाम आहे.
एक महाराष्ट्रीयन स्त्री स्वच्छ नऊवारी साडी नेसून रस्त्यावर बसून गणेशाला अर्पण करण्यासाठी उकडीचे मोदक विकते, तेव्हा रांगेत उभ्या असलेल्या किंवा मंदिरातून बाहेर पडणाऱ्या भक्तांसाठी तो प्रसाद ठरत नाही, तर मंदिरात काम करणाऱ्या सर्व लोकांचा प्रसाद ठरतो. तो पुरवठा साखळीतील सर्वांच्या उत्पन्नाचा स्रोत बनतो. आपण २० रुपयांचा मोदक विकत घेतो (घरी बनवले नसतील तर), तेव्हा त्या छोट्याशा रकमेचा हिस्सा तांदूळ पिकवणारे शेतकरी, तांदळाची पावडर दळणारे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांपासून ते गूळ उत्पादकांपर्यंत, दूध विकणाऱ्यांपर्यंत जातो, काही वाटा तूप तयार करणारे डेअरी मालक, बियाणे तयार करणारे शेतकरी, तेल उत्पादक ते गॅस चुलीला इंधन आणि हो, फेरीवाल्याला शुल्क आकारणारी नगरपालिका या सर्वांनाही जातो. या पुरवठा साखळीत मी काही विसरलोही असेन. पुरवठा साखळीशी निगडित लोक यातून पैसे कमावतातच, पण या उत्सवातून ज्यूस-नारळपाणी विकणारे, मंडपाभोवती चपला-बूट सांभाळणाऱ्यांनाही अप्रत्यक्षपणे रोजगार मिळतो.
परंतु, तेच मोदक एखाद्या ब्रँडेड शोरूममधून विकत घेतले जातात, तेव्हा त्यातून होणारा बहुतेक नफा फक्त एकाच विक्रेत्याला जातो, पण ती महिला २० रु.ना मोदक विकते तेव्हा नफा सर्वांना वाटला जातो. असंघटित बाजारातील हे लोक केवळ नफा समान प्रमाणात वितरित करत नाहीत, तर सीएसआरही करतात. ते पैसे न घेता भुकेल्यांना काही खाऊ घालतात, कधी जेवण्यासाठी पैसे देतात. हेच असंघटित बाजाराचे सौंदर्य आहे आणि कमाईची समान वाटणी करण्यात ते खूप प्रामाणिक असतात. मला आठवते, एकदा एका पुजाऱ्याने मला रामेश्वरमजवळील एका लहानशा गावात एका विशेष मंदिरात सहकुटुंब ‘नाग सर्पदोष’ पूजा करायला सांगितले. तेथे गेल्यावर असे वाटले की, पूजेतून मिळणारी रक्कम हेच गावातील अनेकांचे उत्पन्नाचे साधन आहे, त्यामुळे त्यांचे आर्थिक चक्र सुरू राहते. इतक्या जीवांसाठी योगदान दिल्याने मला समाधान मिळते.
फंडा असा ः गणेशोत्सवापासून सुरू झालेला सणांचा हंगाम चांगल्या प्रकारे साजरा करूया, जेणेकरून समाजातील खालच्या स्तरातील लोकांना त्याचा आर्थिक लाभ मिळू शकेल.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares