रत्नागिरी ः मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांच्या प्रगतीचा घेतला आढावा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
चिपळुणातील उड्डाणपूलाच्या लांबीचे रस्ते कॉक्रीटचे
मंत्री रवींद्र चव्हाण ; सार्वजनिक बांधकामांच्या प्रगतीचा आढावा

रत्नागिरी, ता. १ ः सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकामच्या प्रगतीचा आढावा घेतला.त्यामध्ये पामुख्याने मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची संथ गती, अडथळे अन या कामामुळे निर्माण झालेल्या समस्या आदीवर चर्चा झाली. चिपळूण शहरात चौपदरीकरणाने झालेला गोँधळ, चिपळूणसाठी आवश्यक उड्डाणपूल या बाबी प्रमुख्याने चर्चेत पुढे आल्या. रस्त्यांवरील खड्डे कायमस्वरूपी निकालात निघण्यासाठी चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या लांबीमधील सेवा रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे आदेश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम, अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण यांनी 30 ऑगस्टला राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांच्या प्रगतीबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेतला. बैठकीला मनोज सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव, एस. एस. साळुंखे सचिव (रस्ते), पी. डी. नवघरे सचिव बांधकाम व राज्यातील सर्व मुख्य अभियंता उपस्थित होते.
बैठकीमध्ये मुंबई- गोवा हायवेवरील चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या लांबीमधील सेवा रस्त्यांवर प्रत्येक पावसाळ्यात खड्डयांच्या उद्भवणाऱ्या समस्येबद्दल सविस्तर चर्चा झाली.

सेवा रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण
चिपळूण शहरात कुंभार्ली घाटाकडून येणारी वाहतूक, गुहागरकडून येणारी वाहतूक तसेच रत्नागिरी व मुंबईकडून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार वर्ग यांना चिपळूण शहरात दैनंदिन कामासाठी यावे लागते. त्यांची भविष्यात रस्त्यावरील खड्डयांच्या त्रासातून सुटका होणे आवश्यक असल्याचे मत मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यांनी चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या लांबीमधील सेवा रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे आदेश दिले. यामुळे चिपळूण शहराच्या आजूबाजूने जोडणाऱ्या मार्गांवरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे सेवा रस्ते खराब होणार नाहीत तसेच चिपळूण शहरवासीयांची प्रत्येक पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares