सोलापुरात पहिली लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी – Dainik Prabhat

Written by

सोलापूर – जन्मतः स्त्री अथवा पुरुष देह घेऊन जन्मले तरी त्या देहातील मन नेमके विरोधी लिंगी असल्याची जाणीव झाल्यानंतर जगणेच अस्वस्थ होते. त्यामुळे आपल्या मनाचा आवाज ऐकून प्लॅस्टिक सर्जरी ऑपरेशनद्वारे लिंग परिवर्तन करून घेण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. सोलापुरात ही पहिली लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
सोलापुरातील ख्यातनाम प्लॅस्टिक सर्जन डॉ. शरण बसवा हिरेमठ यांनी मेडिकल हब म्हणून उदयास येत असलेल्या सोलापुरात लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी करून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पहिल्याच प्रयोगात त्यांनी हे यश मिळविले आहे. जेंडर ट्रान्सफॉर्मेशन नावाने परिचित असलेली शस्त्रक्रिया सोलापुरात प्रथमत झाल्यामुळे डॉ. हिरेमठ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रुग्णाच्या इच्छेनुसार नाव न छापण्याच्या अटीवर डॉ. हिरेमठ यांनी लिंगबदल शस्त्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, समाजामध्ये स्व इच्छेप्रमाणे लिंग परिवर्तन करून घेणे आता कॉमन झाले आहे. परंतु या शस्त्रक्रियेची सोय मुंबई, बंगलोर आणि चेन्नई यासारख्या महानगरांमध्ये आहे. शिवाय या शस्त्रक्रियेचा खर्च ही सामान्य रुग्णांच्या आवाक्‍याबाहेर आहे.
परंतु आता सोलापूरसारख्या शहरांमध्ये ही सोय उपलब्ध झाली आहे. विजयपूर, कलबुर्गी, पुणे, जहिराबाद लातूर आणि उस्मानाबाद या सारख्या गावांमधून लिंग शस्त्रक्रियाबाबत उत्सुकता असणाऱ्या रुग्णांची सोय झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. शरण बसव हिरेमठ हे मूळचे बसवकल्याणचे रहिवाशीअसून त्यांचे प्राथमिक शिक्षण कलबुर्गी येथे झाले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे वैद्यकीय शिक्षण संस्था असलेल्या अहमदाबाद येथे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. सोलापुरात अडोरा कॉस्मेटिक सर्जरी अँड हेअर प्लांटेशन नावाने त्यांचे क्‍लिनिक आहे. याच क्‍लिनिकमध्ये त्यांनी ही पहिली लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया पार पाडली.
ईपेपरराशी-भविष्यकोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

Copyright © 2022 Dainik Prabhat
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares