Nanded : लोहा-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
माळाकोळी : लोहा-कंधार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. याशिवाय चांगले कर्तव्य बजावत असलेल्या माळाकोळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची अन्यायकारक झालेली बदली रद्द करण्यात यावी या मागण्यांसाठी माळाकोळी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख माऊली गीते यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. अर्धा तास सुरू असलेल्या रास्तारोको आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
लोहा-कंधार तालुक्यात सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि आता पावसाने ओढ दिल्यामुळे तिथे सूकत आहेत, अशा परिस्थितीत प्रशासकीय सोपस्कार बाजूला ठेवून कंधार लोहा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. तत्काळ कारवाई न झाल्यास यापुढे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आमरण.
उपोषण करण्याचे प्रहार तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) गीते यांनी बोलून दाखवले.या वेळी प्रहार तालुका अध्यक्ष माऊली गीते, कालिदास मुस्तापुरे, नवनाथ वाकरडकर, आत्माराम पांचाळ, व्यंकटराव तिडके, चेअरमन प्रकाश खिमा राठोड, विश्वंभर पांचाळ, संभाजी नवघरे, उद्धव नवघरे, माजी सरपंच माधवराव कांबळे, केशव मस्के, कृष्णा केंद्रे, सखाराम केंद्रे, संभाजी तिडके, संतोष केंद्रे, भीमराव जाधव, बाबुराव तिडके, पांडुरंग पवार, तुकाराम केंद्रे, नारायण नागरगोजे, वामन जाधव, भीमाशंकर कामजळके, मोहन नुचे, शिवसांब कामजळगे, एकनाथ पवार, कृष्णा राठोड, संग्राम केंद्रे, ज्ञानेश्वर केंद्रे, अजित गायकवाड यांचासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares