Breaking News 1 September 2022 Latest Update: लालबागच्या चरणी भरभरून दान – Times Now Marathi

Written by

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

कल्याण : गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी पोलिसासमोर आव्हान उभे केल्याने पोलिसांनी विशेष पथके तयार करत या चोरट्यांचा शोध सुरू केला. या दरम्यान काही आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत ठाकुर्ली येथील  म्हसोबा चौक येथे येणार असल्याची माहिती डोंबिवली रामनगर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती या माहितीनुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, बळवंत भराडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, सुनील भणगे यांनी म्हसोबा चौक येथे सापळा रचला. रात्रीच्या सुमारास  सात जण या ठिकाणी संशयास्पद रित्या फिरताना या पथकाला आढळले. पोलिसांनी तात्काळ या सर्वांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांच्या झडतीत पोलिसांना धारदार कोयता, चाकू, कटावणी, स्क्रु डायव्हर अशा घातक शस्त्रांसह मिरचीची पूड आणि एक नायलॉन दोरी आढळून आली. यामुळे या सर्वांना पोलिसांनी अटक करत त्यांची कसून तपासणी करताच दिवसा रिक्षाचालक म्हणून वावरत रात्री मित्राच्या मदतीने दरोडा टाकत असल्याचे स्पष्ट झाले. 
साताऱ्यातील पर्यटन ठिकाण असलेले कास योगेश्वर परिसरातील बांधकामे अनाधिकृत आहेत अशी भूमिका काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली असता याप्रकरणी सातारच्या आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारचे जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांची भेट घेऊन स्थानिक भूमिपुत्रासह सर्वच बांधकामे अधिकृत करण्यात यावीत अशी भूमिका मांडत प्रशासनाने कास परिसरातील कोणत्याही बांधकामावर हातोडा चालवल्यास आम्ही रस्त्यावर उतरू अशी ठाम भूमिका घेतली आहे तर याच प्रश्नी खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी फक्त स्थानिक भूमिपुत्रांच्या बाजूने बाजू मांडत असल्याचे दिसल्याने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना टोला मारत त्यांच्याच माजी नगराध्यक्षांची बांधकामे सध्या कास परिसरामध्ये युद्धपातळीवर सुरू असून ही जर बांधकामय अनाधिकृत आहेत तर ते तातडीने खासदारांनी थांबवावी असा सल्ला देखील या वेळेला बोलताना त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या राहत्या घरी भेट झाली. शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी बसलेल्या गणपतीचे दर्शनही घेतले. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप कळालेले नाही., 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 58 मते पडली आहेत. उपसभापतीसाठी 1 मत वेगळे, म्हणजेच त्यांना एकूण 59 मते मिळाली. विरोधकांच्या बाजूने शून्य मते पडली. यानंतर विधानसभेचे कामकाज अखेरपर्यंत तहकूब करण्यात आले.
मुकेश अंबानींच्या घरातही बाप्पाचं आगमन
मुकेश अंबानी यांच्या घरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दाखल
अंबानींच्या घरातील बाप्पाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं दर्शन
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, ओडिशा, छत्तीसगड, बिहार, कर्नाटक आणि झारखंडमध्ये ख्रिश्चन समुदाय आणि संस्थांवर हल्ले वाढत आहेत, म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाकडे लक्ष घालावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 
Supreme Court orders the Ministry of Home Affairs to obtain verification reports from Uttar Pradesh, Chhattisgarh, Haryana, Odisha, Madhya Pradesh, Bihar, Karnataka, and Jharkhand on the steps taken on alleged attacks on Christian institutions and priests.
नाशिक : मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ pic.twitter.com/feAbg6Zc9C
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये आधारकार्डवर आधारित गणपतीचा देखावा तयार करण्यात आला आहे. त्यात गणपतीचा कैलासावरील पत्ता आणि जन्मतारीखही नमूद करण्यात आली आहे. 
Jharkhand | A Ganesh Pandal in Jamshedpur has been made in the form of an Aadhar card which identifies the address of Lord Ganesha in Kailash & his date of birth during the 6th century #GaneshChaturthi pic.twitter.com/qupLStkut6
सीरम इन्स्टिट्यूटने गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस तयार केली आहे. आज ही लस लॉन्च करण्यात येणार आहे. कर्करोगासारख्या घातक आजारावर ही लस येत असल्यानं हा सर्वांनाचं दिलासा म्हणावा लागेल. दरम्यान, या लसीची किंमत किती असणार याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे. मात्र, याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief executive officer) अदर पुनावाला यांनी माहिती दिली आहे. गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीची किंमत ही 200 ते 400 रुपयांच्या दरम्यान असू शकते.
वर्धा: काचंनगाव येथे झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान pic.twitter.com/4IUZiKh4dN
लालबागच्या चरणी भरभरून दान, मंडळाकडून मोजणी सुरू#LalbaugchaRaja #mumbai #GaneshFestival pic.twitter.com/KHmMPS0mQL
वर्धा : यशोदा नदीच्या पुरामुळे शीरसगाव ते राळेगाव मार्ग बंद :गावाचा संपर्क तुटला
लालबागच्या राजाला आलेल्या पहिल्या दिवसाच्या दानाची मोजणी सुरू
संगमनेर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
राजभवनचा समुद्र किनारा

आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्यापूर्वी हवामान विभागाने मराठवाडा आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मुंबईत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 
आज संध्याकाळी गणपती विसर्जन:
कृपया IMD अपडेट्स पाहा,विशेषत: दुपार नंतर, IMD द्वारे पुढील 3,4 तासांसाठी जारी करण्यात येणारे इशारे
IMD GFS मॉडेल मार्गदर्शन महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात,मराठवाडा,कोकणातील काही भाग, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दर्शवते.मुंबई ढगाळ
घाट भागात‌ अधिक शक्यता pic.twitter.com/lGxUDv0qdF
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानकडून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी परळी मध्ये लावण्या, अश्लील नृत्य सादर करण्यात आली. नियम पायदळी तुडवत रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होता. या ठिकाणी तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. पोलिसांना सौम्य लाठी चार्ज देखील करावा लागला.
नाशकात सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. ३ महिन्यांपासून त्यांचं वेतन थकित असल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे. यावेळी अनेक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारकडून महाराष्ट्र पोलिसांना गिफ्ट, पोलिसांना खात्यांतर्गतच मिळणार  20 लाखापर्यंतचं कर्ज
गेल्या काही दिवसांमध्ये विविध राजकीय पक्षांचे बडे नेते आवर्जून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना दिसत आहेत. यामध्ये आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचाही समावेश झाला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा नेमका तपशील आणि उद्देश अद्याप समजू शकलेला नाही.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares