इंदापूरात ऑनलाइन पीक पाहणी नोंदीचे सर्व्हर डाऊन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
कळस, ता. ३ : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन पीक पाहणी नोंदण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्व्हर डाउनच फटका बसत आहे. ऑनलाइन पीक पाहणी नोंदणी करून, उताऱ्यावरील पीक पाहणी नोंदीच्या आधारे बँका, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना याचा उपयोग होतो. मात्र गेल्या दहा दिवसांहून अधिक काळापासून तालुक्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना सर्व्हर डाउनच फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पळसदेव येथील माजी उपसरपंच प्रवीण काळे म्हणाले, आम्ही गेल्या चार-पाच दिवसांपासून ऑनलाइन पीक पाहणी नोंदवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने आमचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. परिणामी पीक कर्ज घेण्यास अडचण आली आहे. अशी परिस्थिती बहुतांश शेतकऱ्यांची असून यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दरम्यान येथील गाव कामगार तलाठी महेश मेठे यांना विचारले असता, ‘‘सर्व्हर डाऊन होत असल्याच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अपडेट करण्याचे काम सुरू असल्याने ही समस्या निर्माण झाली असून, येत्या दोन-तीन दिवसात परिस्थिती सुधारेल.’’ परंतु, अनेकदा शेतकरी चुकीची माहिती म्हणजे क्षेत्र, अस्पष्ट फोटो डाऊनलोड करतात. परिणामी अशा अडचणी निर्माण होतात. यामुळे शेतकऱ्यांनी चुकीची माहिती भरू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. तर नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी एखाद्या दिवशी सर्व्हर डाउनची समस्या उद्भवत असल्याचे स्पष्टीकरण दिले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares