बच्चू कडूंना गोड खार द्यायचं की तीखट, हे मुख्यमंत्री ठरवतील; शिंदे गटातील मंत्र्यांच्या वक्तव्याने… – MSN

Written by

अमरावती :
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे ‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा आगळावेगळा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) मेळघाटच्या मुक्कामी दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी थोडाफार फरकाने अनेक राजकीय विषयावर टिपण्या केल्या. ‘मेळघाटचे आमदार राजकुमार पाटील गोड आहे व यांचे मित्र म्हणजे बच्चू कडू हे कडू आहे’, अशी मीश्किल टिपणी करत अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
यामागे काही राजकीय विचार होता का? असे विचारल्यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. आमदार राजकुमार पटेल व आमदार बच्चू कडू हे दोघे म्हणजे राम- लखनची जोडी आहेत. दोघेही आपापल्या ठिकाणी काम करत आहेत. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. ते चांगलं काम करतात, असे सत्तार म्हणाले.
मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे बच्चू कडू नाराज आहेत का? या प्रश्नावरही मंत्री सत्तार यांनी उत्तर दिले. बच्चू कडू नाराज नाहीत. त्यांना गोड द्यायचं, कडू द्यायचं, खारं द्यायचं, की तिखट याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील, असे सत्तार यांनी सांगितले.
उपक्रमात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे बुधवारी रात्री ११ वाजता साद्राबाडी येथे आगमन झाले. यावेळी कृषिमंत्री हे साद्रावाडी येथील शेतकरी दत्तात्रय चुनीलाल पटेल यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. साद्राबाडी येथे आज सकाळी उपक्रमात मंत्री सत्तार यांनी शेतकरी पटेल यांच्या शेतावर उपस्थित राहून शेतीविषयक समस्या, अडचणी, प्रश्न जाणून घेतल्या. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता धारणी येथील पंचायत समिती समोरील परिसरात १० हजार शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचा, तसेच ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी कार्यालयाचा शुभारंभ करणार आहेत.
रात्री शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, सकाळी बांधावर जाऊन विचारपूस, कृषिमंत्र्यांचा मेळघाट दौरा चर्चेत
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांमुळे निर्माण होणारा ताणतणाव, नैराश्य, शेतकरी आत्महत्या याची कारणमीमांसा करून सुलभ व प्रभावी कृषी धोरण तयार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आला आहे. ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमात सहभागी होऊन उपस्थित अधिकाऱ्यांना अब्दुल सत्तार यांनी सूचना दिल्या.
आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर तू मंत्रीपदाच्या शर्यतीत नसता, बच्चू कडूंचा रवी राणांवर प्रहार

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares