Nashik Onion Dahihandi : सटाण्यात शेतकरी संघटनांनी फोडली कांद्याची दहीहंडी, कांदा दरासाठी – ABP Majha

Written by

By: गोकुळ पवार | Updated at : 23 Aug 2022 12:17 PM (IST)

Nashik Onion Dahihandi
Nashik Onion Dahihandi : केंद्र व राज्य शासनाने (Central Government) शेतकऱ्यांची (Farmers) गळचेपी सुरू केली असून कांदा उत्पादक (Onion Farmers) शेतकऱ्यांबाबत कोणतेही ठोस धोरण त्यांच्या जवळ नसल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी मालेगाव (Malegoan) रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpann Bajar samiti) प्रवेशद्वारा समोर रस्त्यावर कांद्याची दहीहंडी 9Onion Dahihandi) फोडून रास्तारोको आंदोलन (Onion Agitation) करीत केंद्र व राज्य शासनाचा निषेध नोंदवला.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकरी जास्तीत जास्त कांदा उत्पादन घेणारा असून बहुतांशी शेतकऱ्यांनी अवाढव्य  खर्च करून कांदा उत्पादन घेतले आहे व शेतातच चाळींमध्ये कांदा साठवून ठेवला आहे. मात्र केंद्र शासनाचे आयात निर्यात धोरण व नाफेडच्या माध्यमातून केली जाणारी चुकिची कांदा खरेदी यामुळे बाजार भाव गडगडले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचा लिलाव सुरू होताच प्रवेशद्वारासमोर कांद्याची दहीहंडी तयार केली. त्या दहीहंडीच्या दोरीला पंतप्रधान, खासदार, आमदार यांनी राज्यसभेत व लोकसभेत कांदा भाव वाढीसाठी आवाज उठवावा तसेच पंतप्रधानांनी कांदा आयात निर्यात धोरण सुरळीत राबवावे व नाफेडच्या धोरणांबाबत लक्ष द्यावे असा संदेश या चित्रातून चित्रकार किरण मोरे यांनी दिला होता‌.
कांदाभावाची कोंडी फुटावी यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली कसमादे भागातील शेकडो शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेट समोर रस्ता रोको आंदोलन केले याप्रसंगी निवासी नाय तहसीलदार विनोद कुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव सटाणा रोडवर बांधलेल्या कांद्याची दहीहंडी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी फोडली तब्बल दोन तास चाललेले या रासो रोको आंदोलन शेकडो कांदा उत्पादक सहभागी झाल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. 
जन आंदोलनाचा इशारा 
गेल्या काही महिन्यांपासून उतरती का लागलेल्या कांदा दराला पुन्हा एकदा भरारी मिळावी प्रति क्विंटल दोन हजार रुपये भाव मिळावा आधी मागण्या करीत सटाणा बाजार समिती बाहेर सोमवारी शेतकऱ्यांनी कांद्याची दहीहंडी फोडली. जोपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरून हलणार नाही केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे. त्यामुळे कांद्याला समाधानकारक भाव मिळाला नाही. तर प्रहार शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक शेतकरी संघटना मोठे जन आंदोलन करतील असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे. 

कांदा चाळीत सडतो आहे…. 
प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने सटाणा बाजार समितीच्या गेट समोर कांदा भावाची कोंडी फुटावी. यासाठी कसमादे मधील कांदा उत्पादक शेतकरी प्रहार शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी एकत्रित सटाणा बाजार समितीच्या आवारात रास्ता रोको आंदोलन केली. सरकार कोणाची असो राज्यातली असो वा केंद्राचे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अतिशय उदासीन आहे. शेतकऱ्यांचा कांदा चाळीत सडतो आहे. नाफेडचा कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव हमीभाव मिळाला हवा, यासाठी हे जनआंदोलन उभारण्यात आल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अभिमन पगार यांनी सांगितले. 
Nashik : सांगली-कोल्हापूरच्या धर्तीवर सिन्नरच्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत करणार : मंत्री गिरीश महाजन
Nashik Central Jail : नाशिकमध्ये कैद्यांनी साकारले पर्यावरण पूरक सुबक बाप्पा
Nashik Mumbai Highway : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे आठ दिवसात बुजवले जाणार, छगन भुजबळांची माहिती
Nashik Bribe Case : नाशिकचा लाचखोर चव्हाणके यांना सशर्त जामीन मंजूर, आठ हजारांसाठी केली होती अटक
Nashik News : नाशिकच्या सुरगाण्यात पुरुषांनी नसबंदीसाठी गर्दी केली, काय आहे नेमकं प्रकरण
BMC : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी, 211 स्वागत कक्ष आणि 10 हजार कर्मचारी तैनात
Traffic Police : आता वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई; ई-चलान मशिन ऐवजी खासगी मोबाईल वापरल्यास दंड
Mumbai : मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा निर्णय  
Baramati : अमेठीचा कार्यक्रम केलाच आहे, आता टार्गेट बारामती; राम शिंदे यांचा पवारांना इशारा
Maharashtra Corona Update : शनिवारी राज्यात 1272 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, चार जणांचा मृत्यू

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares