आता रेशन दुकानातही मिळणार फळे, भाजीपाला; शेतकरी उत्पादक कंपन्यांना विक्रीची परवानगी – TV9 Marathi

Written by

|
Jun 08, 2022 | 8:12 AM
मुंबई : आता लवकरच तुम्हाला रेशन दुकानांमधून (Ration shops) फळे आणि भाजीपाला (Vegetables) देखील खरेदी करता येणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानांमधून फळे आणि भाजीपाला खरेदी करू शकतात. परंतु सध्या तरी ही सुविधा मुंबई (Mumbai) आणि ठाणेकरांसाठीच उपलब्ध होणार आहे. पुणे जिल्ह्यात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आली होती. त्यानंतर आता ही योजना मुंबई आणि ठाण्यात देखील राबवण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना रेशन दुकानांवर फळे आणि भाजीपाला विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अर्थात त्यासाठी काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन करणे शेतकरी उत्पादन कपंन्यांसाठी बंधनकारक असणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ज्या दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली त्यामध्ये पुण्याच्या शाश्वात कृषी विकास इंडिया आणि नाशिकच्या फार्म फिस्ट फार्मर्स प्रोड्यूसर या दोन कंपन्यांचा समावेश आहे. रेशन दुकानांचे उत्पादन वाढावे यासाठी भाजीपाला विक्रिसाठी परवानगी देण्यात आल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
रेशन दुकानावर फळे आणि भाजीपाला विक्रीचा उपक्रम पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला होता. आता त्यानंतर असाच उपक्रम मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या वतीने यासाठी दोन शेतकरी उत्पादक कंपन्या शाश्वात कृषी विकास इंडिया आणि फार्म फिस्ट फार्मर्स प्रोड्यूसर यांना परवानगी देण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. रेशन दुकानांवर फळे आणि भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी संबंधित कंपन्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. रेशन दुकानाचे उत्पादन वाढावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयामध्ये म्हटले आहे. तसेच फळे आणि भाजीपाल्याचे कुठले उत्पादन विकावे याचे कंपनीवर बंधन नसल्याचे देखील शासन निर्णयामध्ये म्हटले आहे.

रेशन दुकानात फळे आणि भाजीपाला विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर लवकरच रेशन दुकानात किराणा मालाची देखील विक्री करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारच्या या नव्या उपक्रमामुळे ग्राहकांना सर्वच गोष्टी एका छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. पुणे, मुंबई आणि ठाण्यानंतर भाजीपाला विक्रीचा प्रयोग इतर शहरात देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares