'50 खोके, मंत्री ओके': मंत्री दादा भुसेंच्या धुळे दौऱ्यात शेतकरी आक्रमक; कांदाप्रश्नी काळे झेंडे दाखवत घोषण… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
मंत्री आणि शिंदे गटातले बंडखोर आमदार दादा भुसे यांना शुक्रवारी धुळ्यात शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले.
कांदाप्रश्नी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी भुसे यांना झेंडे दाखवत ‘पन्नास खोके मंत्री ओके’ अशा घोषणा दिल्या.
समजूत काढण्याचा प्रयत्न
दादा भुसे हे साक्री तालुक्यातील कासारे गावात विकासकामांच्या उद्घाटनासाठी पोहचले होते. विकासकामाच्या लोकार्पणाचा लोकार्पण सोहळा सुरू असतानाच शेतकऱ्यांनी दादा भुसेंना दाखवले काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. भुसे यांनी काळे झेंडे दाखवणार्‍या शेतकर्‍यांना जवळ बोलावले आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक शेतकर्‍यांनी दादा भुसे यांचे एकही ऐकले नाही व त्यांना कांदा प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याचे सुचवले.
कांदाप्रश्न गांभीर्याने घ्या
कांद्याला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून अद्याप साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. शिंदे गटात सामील झालेले नाशिकमधील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांची शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागली. यावेळी त्यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्याकडे कॅबिनेटमध्ये कृषि मंत्रालयाची धुरा होती. शिंदे-फडणवीसांच्या खातेवाटपामध्ये दादा भुसे यांना बंदरे व खणीकर्म खाते देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares