Irfan Pathan and Amit Mishra Tweet : इरफान पठाणच्या आणि अमित मिश्राची ट्वीटर वॉर सुरुच; इरफानने शेअर – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 23 Apr 2022 09:46 PM (IST)
Edited By: शशांक पाटील
amit mishra and irfan pathan
Irfan and Amit : क्रिकेटच्या मैदानातून (Cricket) निवृत्त झालेले दोन भारतीय खेळाडू सध्या ट्वीटरवर एकमेंकाविरुद्ध ट्वीटरवर फटकेबाजी करत आहेत. हे खेळाडू म्हणजे इरफान पठाण (Irfan Pathan) आणि अमित मिश्रा (Amit Mishra). नुकतच इरफानने भारताच्या संविधानाची प्रस्तावना शेअर करत मी कायम याचे पालन करतो आणि प्रत्येक नागरिकांनी करावं अशी विनंती  केली आहे. दरम्यान या ट्वीटमागे एक पार्श्वभूमी असून अमित मिश्राच्या एका ट्वीटला हे उत्तर आहे.


इरफानने दोन दिवसांआधी पहाटेच्या सुमारास एक देशाबद्दलचं ट्वीट केलं. त्याने यावेळी लिहिलं की, ‘माझा देश, माझा सुंदर देश, पृथ्वीवरील सर्वात महान देश होण्याची क्षमता ठेवतो. पण……’ इरफानच्या या ट्वीटमधून त्याने देशातील एकंदरीत परिस्थितीबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. इरफानच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी आपआपली मतं दिली. अमित मिश्रानेही यावर त्याची प्रतिक्रिया देत या प्रश्नार्थक ट्वीटचं जणू उत्तर दिलं. त्याने लिहिलं की, ‘माझा देश, माझा सुंदर देश, पृथ्वीवरील सर्वात महान देश होण्याची क्षमता आहे… हे तेव्हाच होईल जेव्हा देशातील प्रत्येकाला आपलं संविधान महत्त्वाचं असून त्याचं पालन केलं जाणं अधिक महत्त्वाचं आहे.’ दरम्यान या दोघांच्या या ट्वीट्सवर इतरही नेटकरी रिप्लाय देत होते. 
इरफान आणि अमितचे आधीचे ट्वीट्स

 


आता इरफानने संविधानाची प्रस्तावना शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे. ‘मी नेहमी याचे पालन केले आहे. मी आपल्या सुंदर देशाच्या प्रत्येक नागरिकाला याचे पालन करण्याची विनंती करतो. कृपया वाचा आणि पुन्हा वाचा.’ असं इरफानने लिहिलं आहे. त्याच्या या ट्वीटला नेटकरी भरघोस प्रतिसाद देत असून आता अमित मिश्रा काय रिप्लाय देतो का? हे पाहावे लागेल.
हे देखील वाचा-
India Legends: सचिनकडं भारतीय लीजेंड्स संघाचं नेतृत्व; इतर संघ आणि त्यांच्या कर्णधारांची नावं घ्या जाणून
Mushfiqur Rahim Retirement: बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर मुशफिकुर रहीमची टी20मधून निवृत्तीची घोषणा
CSK Captain 2023 IPL: धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; पुढील आयपीएलमध्ये चेन्नईची धुरा पुन्हा माहीकडे, CSKकडून शिक्कामोर्तब
IND vs PAK Asia Cup: टीम इंडिया आज पुन्हा ‘मौका’ साधणार! जाडेजाच्या जागी ‘या’ खेळाडूची वर्णी लागणार; अशी असेल प्लेईंग इलेव्हन
IND vs PAK, Asia Cup 2022, Pitch Report : आज भारत-पाकिस्तान आमने सामने, कशी असेल मैदानाची स्थिती आणि वातावरण?
चिंताजनक!  महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक सर्वात कमी सुरक्षित, NCRB च्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर
IND vs PAK Live Updates: रोहित शर्मा, केएल राहुलची फटकेबाजी, भारताची दमदार सुरुवात
IND vs PAK Playing 11: हार्दिकचं पुनरागमन, रवि बिश्नोईला संधी, कार्तिकला विश्रांती; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
Cyrus Mistry : टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील नेमका वाद काय? ‘या’ सहा आरोपांमुळे मिस्त्रींना सोडावं लागलं होतं अध्यक्षपद
Cyrus Mistry : कार अपघातात सायरस मिस्त्री यांचं निधन, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares