आमची यात्रा सत्य सांगण्यासाठी: राहुल गांधी म्हणाले – भारत गरीब व धनाढ्यांच्या 2 गटांत विभागला, आज त्यांच्या… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
देशात दिवसेंदिवस गगनाला भिडणाऱ्या महागाईविरोधात काँग्रेस पक्ष आज सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील सर्व नेते आज दिल्लीतील रामलीला मैदानावर केंद्र सरकारविरोधात निदर्शने करताना पाहायला मिळत आहेत. देशातील महागाईवर नियंत्रण आणण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. रॅलीमध्ये राहुल गांधी म्हणाले की, द्वेष एका प्रकारची भीतीच आहे. जो घाबरतो, त्याच्या मनात द्वेष उत्पन्न होतो. जो घाबरत नाही, त्याच्या मनात द्वेष निर्माण होत नाही. भारतात द्वेष वाढत चालला आहे, तीच गोष्ट दुसऱ्या पद्धतीने सांगायची तर भारतात भीती वाढत आहे. भविष्याची भीती, महागाईची भीती, बेरोजगारीची भीती… ती वाढतच चालली आहे. त्यामुळे भारतात द्वेष वाढत आहे.
पुढे राहुल गांधी म्हणाले की, लोक द्वेषाने विभागले गेले आहेत, देश दुभंगला आहे आणि कमकुवत झाला आहे. भाजप आणि संघाचे नेते देशात फूट पाडतात आणि जाणीवपूर्वक देशात भीती निर्माण करतात. लोकांना घाबरवणे आणि द्वेष निर्माण करणे. ते कोणासाठी आणि का करायचे असा प्रश्न निर्माण होतो. या द्वेषाचा फायदा कोणाला मिळत आहे? याचा फायदा भारतातील गरीब जनतेला होत आहे का? मोदीजींच्या सरकारने मजूर आणि छोट्या दुकानदारांना काय फायदा दिला? भय आणि द्वेषाचा संपूर्ण फायदा भारतातील दोन उद्योगपती घेत आहेत.
राहुल यांच्या भाषणातील मुद्दे
काँग्रेसमध्ये जाणे सोपे, टिकणे कठीण
या मेळाव्यात बोलताना काँग्रेस नेते आणि लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन म्हणाले, आज महागाईची अशी स्थिती आहे की, बाजारात खरेदीला गेलात तर खिशातील सर्व पैसा संपतो, पण पिशवी शिल्लक राहते.”काँग्रेसमध्ये येणे खूप सोपे आहे, सोडणे सोपे आहे, पण त्यात टिकून राहणे फार कठीण आहे. लोक दोन पावले एकत्र चालतात, मार्ग बदलतात.”, असे म्हणत त्यांनी नुकतेच पक्ष सोडलेल्या गुलाम नबी आझाद यांचीही खिल्ली उडवली.
मोदी मित्रांमध्ये व्यस्त
निदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अकबर रोडपासून रामलीला मैदानापर्यंत नेले. पोलिसांच्या गाडीत बसून सर्व कार्यकर्ते वंदे मातरमच्या घोषणा देत राहिले. आंदोलनापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘राजा मित्रात व्यस्त आहे, जनता महागाईने त्रस्त आहे.’
काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच देशातील महागाईविरोधात आंदोलन करत आहे. महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून, या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पार्टीचे राष्ट्रीय नेते तसेच इतर राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांसह नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सर्वसामान्यांना वाढत्या महागाईने तात्काळ दिलासा देण्यासाठी केंद्राने पाऊल उचलावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.
पुढे वेणुगोपाल म्हणाले की, भाजप सरकारने देशाची अर्थव्यवस्था तळागाळाला आणली आहे. त्यांच्या धोरणांमुळे देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महागाई विरोधात मोदी सरकार असंवेदनशील असून संसदेत देखील यावर बोलायला ते तयार नाहीत. विरोधक केंद्राविरोधात आंदोलन करत असून, सरकार मात्र काहीही बोलायला तयार नाही. सर्वसामान्य नागरिकांबाबत सरकारने विचार करावा.
सरकारला आमचा संदेश
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, “आजच्या हल्लाबोल रॅलीचा राज्याच्या निवडणुकांशी किंवा 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. या असंवेदनशील सरकारला आमचा हाच संदेश आहे की लोक महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहेत.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares