एसकेएम समन्वय समितीतून बाहेर पडले योगेंद्र यादव – तरुण भारत

Written by

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ मोहिमेत सामील
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्वराज इंडिया पक्षाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) समन्वय समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ मोहिमेत सामील झाल्याच्या दुसऱया दिवशी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. योगेंद्र यादव हे शेतकरी आंदोलनातील प्रमुख चेहरे होते. अशा स्थितीत त्यांनी एसकेएम समन्वय समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रकारचे कयास वर्तविण्यात येत आहेत.
शेतकरी विरोधी सरकारसमोर लढण्यासाठी सर्व जनआंदोलनांना सरकारविरोधी राजकीय पक्षांच्या ऊर्जेची जोडले जाण्याची गरज आहे. याचमुळे मी शेतकरी आंदोलनासह अन्य आंदोलनांच्याही संपर्कात आहे. माझ्या स्वराज इंडिया पक्षासह अन्य राजकीय पक्षांसोबत समन्वयाकरता प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांमुळे शेतकरी आंदोलन अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा असल्याचे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares