खारबंदिस्तीसाठी पानंद रस्त्यांची होणार दुरुस्ती – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ५ : शहापूर-धेरंड गावाच्या हद्दीतील धरमतर खाडीच्या पूर्वेस असलेला बांध मागील वर्षी फुटला होता. त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असताना या बांधापर्यंत साहित्य नेण्यासाठी पोहच रस्ता नव्हता. ही अडचण निवासी उपजिल्हाधिकारी पद्मजा बैनाडे यांच्या माध्यमातून दूर झाली असून रस्त्याचे डिमार्केशन करण्यात येणार आहे. त्यानंतर या त्याचे मजबूतीकरण होणार आहे.
खाडी भागात जाण्यासाठी पोहच रस्ता नसल्याने येथील शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. पानंद रस्त्यांचे डिमार्केशन होणार असल्याने रस्ते नव्याने दुरुस्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पानंद रस्ते नसल्याने सर्वांत जास्त अडथळा फुटलेल्या बांधांच्या दुरुस्तीच्या कामात येत होता. वेळेत साहित्य न पोहचल्याने एका वर्षात १८ ठिकाणी बांध फुटले आहेत. हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असल्याने खाडीची बांधबंदिस्तीची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी ग्रामस्थांची होती. ३० मे रोजी शेतकरी आणि खारभूमी विभागाचे अधिकारी यांच्यात झालेल्या ५ किमी बांध आणि दोन उघाडी यांचे पूर्ण दुरुस्तीचे ११.६९ कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. परंतु या बांधावर पक्के मटेरियल नेण्यासाठी आणि गावात येणारे पाणी रोखण्यासाठी गावकऱ्यांना तातडीचा पोहोच रस्ता करण्याच्या मागणीची पूर्तता होत नव्हती. शेवटी गावकऱ्यांनी ८ सप्टेंबरला पायी दिंडी काढण्याचे आंदोलन जाहीर केले. त्याला प्रतिसाद म्हणून निवासी उपजिल्हाधाकरी पद्मजा बैनाडे यांनी पानंद रस्त्याच्या दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares