नरंदे येथे वारणा कालव्यासंदर्भात बैठक – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
वारणा कालवाप्रश्‍नी
नरंदेत रविवारी बैठक
डॉ. भारत पाटणकर यांची उपस्थिती
दानोळी, ता. ५ ः वारणा कालव्याच्या पुढील कामासंबंधीची बैठक श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. ११) दुपारी एक वाजता तनाळी वसाहत, नरंदे (ता. हातकणंगले) येथे होणार आहे. बैठकीला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
डॉ. पाटणकर यांची कृष्णा खोरे महामंडळ, पुणे येथे बैठक झाली होती. त्या आधारे अधीक्षक अभियंत्यांसमवेत २२ फेब्रुवारीला बैठक झाली. तीत वारणेचा कालवा जेथे आला आहे, तेथून पुढे सर्व शेतकऱ्यांना बंद पाइपने पाणी देण्याचे मान्य झाले आहे. त्यामुळे जमीन संपादनाचा प्रश्नच येणार नाही. उलट बंद पाइपने पाणी शेतापर्यंत पोहोचणार असल्यामुळे गळती बंद होऊन जादा जमीन सिंचनाखाली येईल. याचबरोबर, शासकीय योजनेचे पाणी परवडणाऱ्या दरात मिळेल. वीजदर, लिफ्टची देखभाल, दुरुस्ती यातून कायमची सुटका होईल. वारणा धरणाच्या लाभक्षेत्रातील वाकुर्डे योजनेच्या कार्यक्षेत्रात टप्प्या-टप्प्याने याच पद्धतीने कामे सुरू आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा मागे राहता कामा नये, आम्ही प्रकल्पग्रस्त यासाठी लढा उभा करण्याचा प्रयत्न करणारच आहोत; परंतु आपल्यासारखे मूळ गावातील शेतकरी सहभागी झाले, तर लढ्याला ताकद येईल आणि काम लवकर सुरू होईल, सर्वांनी एकत्र मिळून आंदोलन केले तर यश लवकर मिळेल, असे मत श्रमिक मुक्ती दलाचे संघटक नजीर चौगुले यांनी मांडले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares