शेतकरी संघटनेची मागणी: ई -पीक पेरा नोंदणी योजनेअंतर्गत नोंदणीची कामे शेतकऱ्यांवर लादू नका – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ई-पिक पेरा योजना शेतकऱ्यांसाठी कष्टाची ठरत असून या योजनेची कामे शेतकऱ्यांवर लादू नयेत अशी मागणी शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली.
गत वर्षीपासून ई -पीक पेरा नोंदणी योजना सुरु केली. योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असला तरी यावर्षी ई-पिक योजना राबवली जात आहे. त्यामुळे ई-पिक पेरा नोंदणीची कामे शेतकऱ्यांंना करण्याचा आग्रह का? ही कामे शेतकऱ्यावर लादू नका अशी मागणी शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने गुलाबराव म्हसाये यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ई – पिकपेरा नोंदणी करीता बहुतांश शेतकऱ्याकडे मोबाईल नाही. त्यांना ते करता येत नाही. त्यामुळे शेतकरी पिक पेरा पासून वंचित राहतील. आर्थिक, मानसिक व शारीरिकरित्या खचलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच पीक पेरा कसा भरावा. निवेदन देतेवेळी गुलाबराव म्हसाय, तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना सुरेश जोगळे, जिल्हाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी बांधव उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares