पुणे महापालिकेचे पाणी बंद करणार – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून पुण्याला पाणी जात असलेल्या जॅकवेलजवळ बसून येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन करणार आहे.
चाकण – खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून पुण्याला पाणी जात असलेल्या जॅकवेलजवळ बसून येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन करणार आहे. जॅकवेलही बंद करू. आम्हाला धरणाचे पाणीच नाही, तर धरणग्रस्तांना आमच्या जमिनी आम्ही का द्यायच्या? काही धरणग्रस्त व एजंट संबंधित काही अधिकाऱ्यांची शासनाने चौकशी करून ज्या जमिनी धरणग्रस्तांना दिल्या आहेत, त्या सर्व गैरव्यवहाराची चौकशी शासनाने त्वरित करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. आम्ही आंदोलन करून पुण्याचे पाणी बंद करणार आहोत, असा निर्धार शेतकऱ्यांनी रासे (ता. खेड) येथे झालेल्या बैठकीत केला.
चाकण परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसंदर्भात रासे येथे बैठक आयोजित केली होती. त्यात शेतकऱ्यांनी विचार व्यक्त केले. महसूल विभाग, प्रशासन व एजंट यांच्या विरोधात आग पाखड केली. या बैठकीला बाधित शेतकरी धीरज मुटके, गजानन गांडेकर, सूर्यकांत मुंगसे, नंदकुमार मुंगसे, संतोष गांडेकर,अमोल मोहिते, गणेश शिंदे, संकेत मुंगसे,आकाश गवते, काळुराम मुंगसे, चेतन कारंडे, प्रकाश मुंगसे, ऋषिकेश भुजबळ, बाळासाहेब मुंगसे, सुभाष मुंगसे, गणेश मुंगसे, अनिल मुंगसे, शंकर मुंगसे, दत्तात्रेय लोणारी, उत्तम कुटे, संदीप जाधव, बाळासाहेब मुंगसे, प्रसाद घेनंद आधी चाकण व परिसरातील गावातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी धीरज मुटके, गजानन गांडेकर, सूर्यकांत मुंगसे, नंदकुमार मुंगसे व इतरांनी सांगितले की, भामा आसखेड धरणग्रस्त काही लोक, नेते, कार्यकर्ते यांनी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून व काही एजंटांचा वापर करून रासे, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी, काळुस या परिसरात जमिनी घेतल्या आहेत. काही जण जमिनींचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एजंटांना त्या जमिनी मिळवून द्यायच्या, त्यानंतर इतर लोकांना त्या जमिनी कोट्यावधी रुपये किमतीत विकायच्या, असा त्यांचा डाव आहे. काहीजणांनी हे प्रकार केले आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीला भामा आसखेड धरणाचे पाणी मिळाले नाही. भामा आसखेड धरणाचा कालवाही या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलेला नाही.
त्यामुळे सातबारा उताऱ्यावरील लाभ क्षेत्राचा शिक्का काढावा, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. या मागणीचा शासनाने विचार केला नाही; तर पुणे महापालिकेला जे पाणी भामा आसखेड धरणावरून जात आहे, ते आंदोलन करून बंद केले जाईल.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares