अन्नपुर्णा शुगरचा गुरूवारी बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
१४१३
शाहूवाडी, शिराळा परिसरात वावरणाऱ्या
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
तुरुकवाडी : शिराळा पश्र्चिम व शाहूवाडी उत्तर भागात दहशद माजविणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बारा बलुतेदार समाज विकास संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कदम यांची खासदार धैर्यशील माने यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, शिराळा व शाहूवाडीतील पश्चिम भागामध्ये बिबटे परिसरातील शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, वस्तीवरील कुत्र्यांवर वारंवार हल्ले करीत आहेत. यात शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनाकडून मिळणारी अल्प प्रमाणात भरपाई लवकर मिळत नाही. वनविभागाला येथील शेतकरी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करत आहेत; परंतु वनविभाग गांभीर्याने पाहत नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावेत.
अन्नपूर्णा शुगरचा गुरुवारी बॉयलर अग्निप्रदीपन
म्हाकवे : केनवडे (ता. कागल) येथील श्री अन्नपूर्णा साखर कारखान्याचा द्वितीय गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ गुरुवार (ता. ८) सकाळी साडेदहा वाजता जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थान कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय घाटगे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कृषितज्ज्ञ विजयसिंह भोसले उपस्थित राहणार आहेत. गोकुळ संचालक अंबरिषसिंह घाटगे, संचालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. कारखान्याचे संचालक धनाजी गोधडे यांच्या हस्ते सपत्नीक धार्मिक विधी होणार आहेत. ऊस उत्पादक, सभासद शेतकरी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केला आहे.
००५७५
निवडेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
असळज : निवडे (ता. गगनबावडा) येथे जाणता राजा युवा ग्रुप व डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या ज्ञानशांती रक्तपेढीतर्फे गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर झाले. शिबिरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्‌घाटन सरपंच दगडू भोसले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील, केरबा पाटील, शहाजी सुतार, सूर्यकांत पडवळ, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील, दीपक पाटील, गणपती धुमाळ, ऋतुराज खानविलकर, जाणता राजा युवा ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष रविराज भोसले, संकेत पाटील, गणपती साळोखे आदींसह रक्तदाते, जाणता राजा युवा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
३२११
घुंगूर येथे रक्तदान शिबिर
पुनाळ : हनुमान तरुण मंडळाच्या पुढाकाराने येथे रक्तदान शिबिर झाले. अध्यक्षस्थानी रामचंद्र खोत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘रक्तदान हे मोठे योगदान आहे. रक्तदानसारखे दुसरे कोणतीही मोठे योगदान नाही. आजच्या तरुण पिढीने सामाजिक कामातून कर्तव्य पार पाडावे.’’ ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष आनंद पाटील, शिवसेना शाखाप्रमुख उत्तम पाटील, मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मानसिंग सावरे यांनी आभार मानले.
कौलवमध्ये पोलिस भरतीपूर्व परीक्षा
शाहूनगर ः कौलव (ता. राधानगरी) येथील नवीन वसाहतीतील श्री गणेश तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमित्त पोलिस भरतीपूर्व लेखी सराव परीक्षा घेतली. स्पर्धेमध्ये २३० जण सहभागी झाले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. स्पर्धेत शुभम पाटील, बाबूराव पाटील, दशरथ यमकर व राहुल पट्टेकरी यांनी क्रमांक मिळवले. संतोष पाटील व धनाजी पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विजय पाटील व प्रा. पवन पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप नलावडे यांनी स्वागत केले. प्रा. सुहास जाधव यांनी प्रास्ताविक केले. सतीश चरापले, एस. जी. पाटील, प्रतिभा बनछोडे, पोलिसपाटील डी. एस. कांबळे, दीपक चरापले, प्रकाश गायकवाड, सुशांत पाटील, सागर लोहार, विक्रम पवार, प्रकाश कांबळे, दीपक नलवडे, भीमराव सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. उपाध्यक्ष धीरज पवार यांनी आभार मानले. व्ही. जी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
१७६५
1764
‘ॲक्युपंक्चर’च्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. सुतार
बोरपाडळे : राज्यामध्ये प्रथमच ॲक्युपंक्चर असोसिएशनची स्थापना झाली आहे. वैद्यकीय उपचारावेळी येणाऱ्या समस्या, संकटे आणि अडचणीच्या वेळी या प्रॅक्टिशनरांच्या पाठीशी राहता यावे, या उद्देशाने डॉ. माधव हिवाळे यांनी ‘ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनर असोसिएशन’ची स्थापना केली आहे. असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी येथील समर्थ हॉस्पिटलचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. संतोष सुतार यांची, तर डॉ. साक्षी सुतार यांची महिला उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे, राष्ट्रीय सचिव डॉ. रमेश लबडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड झाली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares