अस्तरीकरणासाठी रास्तारोकाचा निर्धार – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
वालचंदनगर, ता. ६ : नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरणासाठी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकरी आक्रमक झाले असून अस्तरीकरणाच्या जनजागृती करण्यासाठी शेतकऱ्यांनी निमसाखरमध्ये (ता. इंदापूर) बैठक आयोजित केली होती. यामध्ये अस्तरीकरणाचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यासाठी जनजागृती करणार आहेत. तसेच पुढील आठवड्यामध्ये रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्धार केला.
नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मुद्यावरुन बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यामध्ये मतभेद आहेत. काही शेतकऱ्यांनी अस्तरीकरणाला पाठिंबा दिला आहे तर काही शेतकऱ्यांनी अस्तरीकरणाला विरोध केला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये अस्तरीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अस्तरीकरणाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी (ता.४) निमसाखर बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीमध्ये इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. पश्‍चिम भागातील निरवांगी, खोरोची, दगडवाडी गावामध्ये जाऊन जनजागृती करण्याचा निर्धार केला.तसेच १२ सप्टेंबर रोजी ५४ फाटा येथे रास्तारोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, माजी सभापती जयकुमार कारंडे, वीरसिंह रणसिंग, उद्योजक विनोद रणसिंग, पप्पू रणवरे, बाबूराव रणवरे, अनिल रणवरे, हर्षल रणवरे, सचिन रणवरे आदी उपस्थित होते.

उन्हाळ्यात पाणी मिळण्यास होणार मदत
नीरा डाव्या कालव्याच्या ५४ क्रंमाकाच्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये कमी व उशिरा पाणी मिळते. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जळून जात असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान होते. कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये वेळेवर पाणी मिळण्यास मदत होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

02468
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares