जखमेवर मीठ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांस आमदाराकडून २ हजारांची मदत – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
बुधवार ७ सप्टेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 08:22 PM2022-09-06T20:22:06+5:302022-09-06T20:29:13+5:30
यवतमाळशेतकरी आत्महत्या ही महाराष्ट्रातील जलीट समस्या बनली असून विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबताना दिसत नाहीत. सरकार शेतकऱ्यांसाठी पॅकेजेस जाहीर करते, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांस मदत जाहीर करते. मात्र, कर्ज आणि नापिकी किंवा अतिवृष्टीमुळे आत्महत्या होतच आहेत यवतमाळ जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या करत जीवन संपवले. मात्र, या पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या आमदाराने चक्क बंद पाकिटात २ हजार रुपयांची मदत देऊन जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  
                                 
उमरखेड तालुक्यातील हिरामण नगर -निंगणुर येथील शेतकरी चंपत नारायण जंगले यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आमदार नामदेवराव ससाने यांनी भेट देऊन बंद लिफाफामध्ये दोन हजारांची भेट दिली. आमदार महोदयांनी आत्महत्याग्रस्त कुटूंबाची एक प्रकारे थट्टाच केल्याचं दिसून आलं. या प्रकरणाचा गाजावाजा होताच आमदार ससाणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून आणखी तीन हजार रुपये पाठवून मोठा दिलदार पणा दाखवला. दरम्यान, आमदार महोदयांचे हे कृत्य म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. तर, सोशल मीडियातूनही संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार नामदेवराव ससाणे हे भाजप पक्षातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे, दुसरीकडे पक्षाने नुकत्याच आयोजित केलेल्या दहीहांडीत कार्यक्रमात आमदार नामदेव ससाणे यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून पुढल्या वर्षी दहीहंडी बक्षीस रक्कम दोन लाख देण्याचे जाहीर केले. मात्र, आमदारांकडून आलेल्या दोन हजार रुपयांच्या मदतीचं काय करावं, सासूचा दवाखाना की शेतीसाठी खतं-बियाणं आणावीत, असा प्रश्न आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पीडित पत्नीला पडला आहे.
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares