तब्बल ३१ लाखांचा मेंढा पाहिल्यावर मंत्रीही झाले आवाक ; आटपाडीतील शेतकरी मेळाव्यातील घटना – Loksatta

Written by

Loksatta

सांगली :  केवळ ६४ दिवसांचे वय, तरीही बाजारात मागणी ३१ लाखांची. अशा माडग्याळ जातीचा मेंढा पाहून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईही आटपाडी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात अवाक झाले. शेतकरी मेळाव्यात या मेंढय़ाचा मंत्र्यांच्या हस्ते हार घालून सन्मान करण्यात आला.
माणदेशी आटपाडी तालुक्यातील जातिवंत खिलार जनावरे आणि शेळय़ा-मेंढय़ांना अनेक वेळा अविश्वसनीय किंमत मिळाली आहे. बाजार समितीच्या आवारात मेंढय़ांच्या यात्रेत काही जातिवंत मेंढय़ांना एक ते दीड कोटी रुपयांची मागणी झाली आहे.
डोक्याला पोपटाच्या चोचीचा आकार असलेल्या  मेंढय़ाला मोठी किंमत सांगितली जाते. प्रत्यक्ष व्यवहार झाला नाही तरी या बकऱ्यांचे मोल मोठे आहे. येथील शेतकरी सुबराव पाटील व विलास पाटील यांनी जतन केलेल्या जातिवंत माडग्याळ  वंशावळीच्या ६४ दिवसांच्या मेंढय़ाला ३१ लाख रुपयांची मागणी झाली. मात्र, त्यांनी सौदा करण्यास नकार दिला आहे.
शेतकरी मेळाव्यात या मेंढय़ाचा नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. यावेळी गृहराज्यमंत्री देसाई यांच्यासह खा. धैर्यशील माने, आ. अनिल बाबर आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे यांनी आ. बाबर यांनी या जातीबाबतची माहिती घेतली. मेंढय़ाचे मोल ऐकून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या मेंढय़ाचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ministers surprised after saw sheep worth 31 lakhs zws

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares