शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची धामणी शाखेला भेट – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
पारगाव, ता. ६ : धामणी (ता. आंबेगाव) येथील बँक ऑफ महाराष्ट्र धामणी शाखेला शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन बँकेबाबत असलेल्या समस्या व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिल्या. तालुक्याच्या पूर्वभागातील लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, पोंदेवाडी, वडगावपीर, मांदळेवाडी, लाखणगाव आदी गावांतील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बँक आहे.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या सूचनेवरून निरगुडसरचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या मंडळाने बँकेला भेट दिली.
यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, वाळुंजनगरचे माजी सरपंच महेंद्र वाळुंज, शिरदाळे उपसरपंच मयूर सरडे, सोसायटी संचालक जयदीप चौधरी, अजित बोऱ्हाडे, सचिन बोऱ्हाडे, प्रतीक जाधव पाटील, मयूर बोऱ्हाडे, प्रतीक दिवेकर, गणेश पानसरे व शेतकरी उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares