समाज प्रबोधनात्‍मक चित्र देखाव्यांना पसंती – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
अलिबाग, ता. ७ (बातमीदार)ः जिल्ह्यात अनेक सार्वजनिक मंडळांकडून समाज प्रबोधनात्‍मक देखावे साकारण्यात आले आहेत. काहींनी मोबाईलच्या अतिरेकामुळे होत असलेले दुष्परिणाम, शेतकरी जगला पाहिजे या भूमिकेतून बैलगाडीचे देखावे, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तिरंग्याचे महत्त्व आदी विषयांवर देखावे साकारले असून ते पाहण्यासाठी भक्‍तांची गर्दी होत आहे.
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. आजच्या पिढीला देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्मांची माहिती असावी, यासाठी अलिबाग तालुक्यातील चोरोंडे येथील अशोक शांताराम नाईक यांनी तिरंग्याचे देखावा साकारला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला राष्ट्रध्वजाच्या तीन रंगाची महत्त्‍व ते सांगतात. यापूर्वी त्यांनी पर्यावरणचा समतोल राखत कापडी साहित्याचा वापर करत सजावट केली आहे.
अलिबाग – रोहा मार्गावरील नांगरवाडी येथील रमेश बाळकृष्ण धुमाळ यांनी यंदा मोबाईलच्या अतिरेकामुळे होणारे शारीरिक व मानसिक त्रास याची जाणीव चलचित्रामार्फत दाखवली आहे. चिडचिडेपणा, एकल कोंडेपणा, ताणतणावाचा दैनंदिन जीवनावर परिणाम होते असून सृदृढ मानसिक स्‍वास्‍थ्‍यासाठी मैदानी खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा संदेश देण्यात आला आहे. धुमाळ हे पेशाने शिक्षक असून त्यांनी यापूर्वी अमृत महोत्सव, शिवाजी महाराजांचा इतिहास, स्‍त्री भ्रूण हत्या, प्लास्‍टिक मुक्ती, कारगिल युद्ध, स्वच्छ भारत अभियानसारखे उपक्रम राबवून समाज प्रबोधनातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वच्छ भारत अभियानच्या त्यांच्या चलचित्राची दखल केंद्र व राज्य सरकारने घेऊन शासनाच्या वेबसाईटवर धुमाळ यांनी तयार केलेल्या स्वच्छ भारत अभियान या चलचित्राची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले.
तालुक्यातील दिवीपारंगी येथील मिलिंद घरत यांनी बैलगाडीचे चलचित्र तयार केले आहे. बैलगाडी शर्यत उठविल्यानंतर शेतकऱ्यांना याचा कसा फायदा झाला, याची माहिती चलचित्राद्वारे देण्यात आली. बैलांच्या खरेदी विक्रीमुळे शेतकऱ्यांना जोड धंदा मिळाला. शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळू लागले आहे. त्यामुळे शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे, या भूमिकेतून हे चलचित्र तयार केले आहे. तर भारत घरत यांनी कंपन्यासह वेगवेगळ्या वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषणाची माहिती देत यातून बचावासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ चा संदेश दिला आहे. तसेच ग्रामपंचायत व नगरपालिकांनी प्रदूषण मुक्त गाव, शहरासाठी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे असेही आपल्‍या देखाव्यातून सांगण्याचा प्रयत्‍न केला आहे.
……….
फलकांद्वारे इकोफ्रेंडली गणेशोत्सावर भर
‘माझी वसुंधरा’ अभियानातून जनजागृती
अलिबाग, ता. ७ (बातमीदार) ः पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून फलकांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना तसेच गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भक्तांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा पीआपींच्या गणेशमूर्तींमुळे होणारे प्रदूषण टाळा. पूजेचे साहित्य व निर्माल नदी, समुद्रात टाकू नका, कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करून नदी, समुद्रात होणारे प्रदूषण रोखा, मिरवणुकीत डॉल्बीसारख्या मोठ्या आवाजातील वाद्यांचा व फटाक्यांचा वापर टाळा अशा संदेश फलकांद्वारे जनजागृतीचा प्रयत्‍न नगरपरिषदेने केला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares