Central Government: पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी, केंद्र सरकारचा काय आहे Mega plan? – TV9 Marathi

Written by

|
Mar 29, 2022 | 4:03 PM
मुंबई :  (Central Government) केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवत आहे. (Production Increase) शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे आणि शेती व्यवसाय सुखकर व्हावा यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. असाच एक मेगा प्लॅन सरकार शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहे. यामध्ये पीक पेरणीपासून ते बाजारपेठेची माहिती शेतकऱ्यांना एकाट ठिकाणी मिळणार आहे. (Mobile App) ‘सुपर अॅप’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही माहिती पुरवण्याचा प्रयत्न केंद्राचा राहणार आहे. यामध्ये पीक पेरणी, मशागत, उत्पादन, काढणी पश्चात त्याचे व्यवस्थापन एवढेच नाही तर हवामान आणि बाजारपेठेची माहितीही शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या अद्यावत अॅपच्या माध्यमातून केला जाणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.स्मार्टफोनची उपलब्धता आणि इंटरनेटचा वाढता पसारा पाहता सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक अॅप लाँच केले आहेत. आतापर्यंत शेती संबंधी अनेक अॅप तयार करण्यात आलेले आहेत. पण सर्वच अॅप मोबाईलमध्ये ठेवणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे सरकारी योजना आणि इतर सर्व माहिती ही या एकाच अॅपमधून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
अॅप संबंधी एका कृषी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शेती आणि शेतीशी संबंधित सर्व माहिती एकाच अॅपमध्ये मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.यामध्ये हवामान, बाजारपेठेचे अपडेट्स, सरकारी योजना, कृषी सेवा आणि देशाच्या विविध भागांसाठी जारी केल्या जाणाऱ्या कृषी विषयक सल्ल्याची माहिती व नवीन संशोधन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. अहवालानुसार, किसान सुविधा, पुसा कृषी, एमकिसन, शेटकरी मासिक अँड्रॉइड अॅप, फार्म-ओ-पेडिया, पीक विमा अँड्रॉइड अॅप, कृषी बाजार, इफको किसान आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे कृषी ज्ञान यांचे एकत्रीकरण करून एकच अॅप तयार करण्याच्या योजनेवर कृषी मंत्रालय काम करत आहे. याबरोबरच आयसीएआर आणि त्याच्याशी संलग्न संस्था, राज्य कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि इतर विभाग अशा सरकारी संस्थांच्या शेतकऱ्यांसाठीचे सुपर अॅपमध्ये विलीन करण्यात येणार आहे.
कृषी संबंधी असणारे सर्व अॅप एकत्र करून ‘सुपर अॅप’ तयार केल्यास शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे एकपेक्षा अधिक अॅपची गरज भासणार नाही. आता सुपर अॅपच्या माध्यमातून त्यांना विविध प्रकारची माहिती मिळू शकणार आहे.सुपर अॅपच्या प्रगतीबाबत नुकतेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.येत्या काही आठवड्यांत हे अॅप लाँच होऊ शकते. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक, उत्पादन, तंत्रज्ञान, काढणीपश्चात व्यवस्था यासह इतर विविध विषयांवर माहिती देण्यात येणार आहे.
Latur Market : सोयाबीन दराचा पुन्हा चढता आलेख, शेतकऱ्यांसमोरील समस्या मात्र कायम..!
Soybean : पावसाळी पिकाला उन्हाच्या झळा, फुलअवस्थेत असलेल्या सोयाबीनवर परिणाम काय?
Photo Gallery : कृषी महाविद्यालयात बियाणे महोत्सव, कडधान्यातून साकारलेल्या रांगोळी आकर्षणाच्या केंद्रस्थानी

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares