तक्रारवाडीत गोठा कोसळून पाच जनावरांचा मृत्यू – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
खळद, ता. ८ : तक्रारवाडी (ता. पुरंदर) येथे गुरुवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास शेतकरी शिवाजी तुकाराम खेंगरे यांचा जनावरांचा गोठा कोसळल्याने दोन कालवड, दोन शेळी व एक करडू, यांचा मृत्यू झाला.
याबाबत प्रत्यक्षदर्शी शेतकरी अजित खेंगरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारपासून या भागात सुरू असलेल्या पावसामुळे गुरुवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. साधारणपणे १२ ते १३ फूट उंच दगड मातीचे बांधकाम असणारी भिंत व त्यावरती जुन्या काळातील लाकडी वासे व त्यावर सिमेंट पत्रा, अशी मजबूत रचना असणारा गोठा कोसळल्याने ही हानी झाली. यामध्ये एक कालवड लागवडी योग्य झाली होती, तर मृत शेळी ही आज-उद्या व्यायला आली होती.
याबाबत गाव कामगार तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनीही घटनास्थळी भेट दिली. तसेच, जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या शेतकऱ्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाई व शेळ्यांचे पालन केले होते. जनावरांना नवीन गोठा मिळावा यासाठीही जिल्हा परिषदेच्या मागेल त्याला गाईचा गोठा या योजनेत दोन वर्षांपूर्वी अर्ज केला होता. त्यांचा गोठा मंजूर झाला होता, परंतु प्रशासनाने मात्र त्यांना कळवलेसुद्धा नाही. जर गोठा मंजूर आहे अन् जर वेळेत गोठा झाला असता तर आज ही जीवितहानी झाली. याची तातडीने चौकशी व्हावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या राज्य अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी केली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares