बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील कचरा उचल करा – Tarun Bharat – तरुण भारत

Written by

तातडीने उचल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहराचा कचरा तुरमुरी येथील कचरा डेपोमध्ये टाकण्यात येतो. बऱयाचवेळा वाहने नादुरुस्त होतात. त्यामुळे बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याच्या बाजुलाच कचरा डंप केला जातो. तो कचरा पुन्हा उचलला जात नाही. त्यामुळे अशा कचऱयाचे ढीग अनेक ठिकाणी साचून आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तेव्हा तातडीने कचऱयाची उचल करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका पत्रकाद्वारे दिला आहे.
बेळगाव-वेंगुर्ला या बेळगाव आणि महाराष्ट्राला जोडणाऱया निसर्गरम्य रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. त्याचबरोबर बरीच गावे देखील वसली आहेत. या रस्त्यावरुनच शहराचा कचरा तुरमुरी डेपो येथे नेऊन डंप केला जातो. या वाहनातून बऱयाचवेळा रस्त्यावरच कचरा पडत जातो. कधीकधी वाहने बंद पडतात. ती दुरुस्त करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला कचरा डंप केला जातो.
आंबेवाडी क्रॉसजवळ तसेच बेळगुंदी क्रॉसजवळ मोठे कचऱयाचे ढीग टाकले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा कचरा तसाच पडून आहे. त्याकडे महापालिकेचे कर्मचारी किंवा स्थानिक ग्राम पंचायतीचेही दुर्लक्ष होत आहे. मात्र या कचऱयामुळे कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ये-जा करणाऱया वाहनांसमोर ही कुत्री आडवी येत आहेत. त्यामुळे अपघातही घडत आहेत. तेव्हा मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी या रस्त्यावरील सर्व कचरा आता बेळगाव महापालिकेनेच उचलावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares