Raju Shetti : एफआरपीवरून स्वाभिमानीने फुंकले रणशिंग, गतवर्षीची थकबाकी अधिक २०० रुपये दिल्याशिवाय ऊसाला लावू देणार नाही हात – Times Now Marathi

Written by

सांगली : साखर कारखानदारांनी मागील वर्षीची शिल्लक राहिलेली एफआरपी आणि अधिक २०० रुपये द्यावेत. अन्यथा ऊसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच या हंगामात एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेट्टी हेे सांगलीच्या इस्लामपूर येथे आले हाेते. त्यावेळी त्यांनी साखर कारखानदारांना इशारा दिला. (Raju Shetty: Self-righteous trumpet blast on FRP, will not allow hand to plant sugarcane unless last year’s arrears are paid plus Rs.)
अधिक वाचा : Yakub Memon Grave : याकुब मेमनच्या कबरवर कुठलेही सुशोभीकरण नाही, विश्वस्त शोएब खातिब यांचे स्पष्टीकरण
सांगली जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केले आहेत. अजूनही अनेक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळाली नाही. मागील हंगाम चांगला गेला. तसेच बाजारात साखरेला चांगली मागणी होती.त्यामुळे साखर कारखानदारांनी एफआरपी आणि अधिक २०० रुपये द्यावेत. थकीत बिलावर १५ टक्के व्याज द्यावे. बाजारात साखरेला ३२०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे असेही शेट्टी यांनी नमूद केले.

दरम्यान कारखानदारांनी एफआरपी अधिक २०० रुपये न दिल्यास ऊसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. तसेच या हंगामात एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares