गडहिंग्लजला आज शमनजींचा नागरी सत्कार, शेतकरी मेळावा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
49104
गडहिंग्लजला आज शमनजींचा
नागरी सत्कार, शेतकरी मेळावा
गडहिंग्लज, ता. १० : शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रियाज शमनजी यांचा उद्या (ता. ११) वाढदिवस होत आहे. यानिमित्त डॉ. रियाज शमनजी वाढदिवस गौरव समितीतर्फे त्यांचा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते दुपारी चारला नागरी सत्कार आणि शेतकरी मेळावा होणार आहे. संकेश्‍वर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम होईल.
तळागळातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची दारे खुली व्हावीत, या उद्देशाने शमनजी यांनी नेसरीसारख्या ग्रामीण भागात शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना केली. या माध्यमातून शमनजी यांचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. शिवसेना स्थापनेपासूनच ते पक्षात सक्रिय आहेत. शिवसैनिक म्हणून मुंबईतील राजकीय अनुभवाच्या पाठबळावर ते गडहिंग्लजच्या राजकारणात सक्रिय झाले. महापूर काळात तालुक्यातील पूरग्रस्त अरळगुंडी, कडलगे, इदरगुच्चीत मदतीचा हात दिला. हलकर्णी भागातील असंख्य मुलांना शैक्षणिक मदत केली. तेरणीतील धनगर समाजातील तीन मुलांना शिक्षणासाठी त्यांनी दत्तक घेतले आहे. पूरपरिस्थिती, कोरोना आणि सामान्य जनतेची कोणतीही समस्या असो, ते नेहमीच मदतीला धावून जातात. आगामी जिल्हा परिषद निवडणूक ते हलकर्णी मतदारसंघातून लढवू इच्छितात. त्यादृष्टीने त्यांचे हलकर्णी भागातील काम गतीने सुरू आहे. त्यांनी या भागातील अनेक समस्या सोडविण्यात यश मिळविले आहे.
वाढदिवसानिमित्त डॉ. शमनजी यांचा आज नागरी सत्कार होत आहे. याशिवाय, शेतकरी मेळावाही होईल. सदा परब, अरुण दुधवडकर, विजय देवणे, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती राहील. गौरव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कंग्राळकर, सचिव सुलोचना रेडेकर, सदस्य मुरलीधर माळी, मुफासिरा बारगीर, ओमप्रकाश जाधव, आशिष कुंभार यांच्यासह शमनजी ग्रुपमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares