Latur : शिंदाळा येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या – ABP Majha

Written by

By: निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा | Updated at : 10 Sep 2022 06:19 PM (IST)
Edited By: प्राची आमले
रावसाहेब शिवराम घोडके
लातूर :  शिंदाळा येथील एका 85 वर्षीय प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने  (Farmer Sucide)  शुक्रवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांच्या मतानुसार, वीजनिर्मिती करणाऱ्या महाजनको कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे कुटुंबीयांनी सांगितले,
लातूर जिल्ह्यातील शिंदाळा हे गाव औसा तालुक्यात येते. या गावातील 85 वर्षे शेतकरी रावसाहेब शिवराम घोडके यांनी आत्महत्या केली आहे. शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार आत्महत्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली आहे. त्यांच्या आत्महत्येला महाजनको जबाबदार आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 
गेल्या काही महिन्यांपासून प्रकल्प ठिकाणी महाजनको कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी सातत्याने आंदोलन करत आहेत. मात्र महाजनकोकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून रावसाहेब घोडके यांनी आत्महत्या केल्याचं च कुटुंबीयांचे मत आहे. महाजनकोविरोधात प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन देखील केले. त्या आंदोलनामध्ये रावसाहेब यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला होता. त्या दिवसापासून त्यांचा मुलगा पोलिसांपासून वाचण्यासाठी गाव सोडून गेला आहे. या नैराश्यतून त्यांनी आत्महत्या केली आहे
औसा तालुक्यातील शिंदाळा (लो.) येथे नियोजित भेल व महाजनकोच्या वायू विद्युत प्रकल्पासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या होत्या. त्यात रावसाहेब घोडके यांचीही 5 हेक्टर 71 आर एवढी जमीन जवळपास 10 ते 12 वर्षांपूर्वी संपादित झाली होती. जमिनी संपादित करतावेळी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आले होते. मात्र गेल्या दहा वर्षांपासून वायू विद्युत प्रकल्प झालाच नाही. उलट त्याचे रूपांतर सौर ऊर्जा प्रकल्पात झाले आहे..

काल दुपारी रावसाहेब यांनी आत्महत्या केल्याचा समोर आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण तयार झाले होते. जोपर्यंत यातील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घ्यायचं नाही असा निर्धार प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी कालच केला होता.भादा पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
NEET Exam : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले, अकोल्यातील मुलीने नदीत उडी घेऊन संपवलं आयुष्य

  
 
Latur Rain: लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, निलंगा तालुक्यात सगळीकडं पााणीच पाणी, पिकांना जलसमाधी
Latur Congress Agitation : राष्ट्रावादीच्या आमदारासमोर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, शेतकरी समस्येचा वाचला पाढा, आमदाराचा काढता पाय
Latur Rain : लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस, पिकं वाहून जाण्याची वेळ, शेतकरी चिंतेत
Latur : लातूरमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी, 27 लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटे फरार
Rain In Marathwada: गेल्या चार दिवसांत मराठवाड्यात 21 मिमी पाऊस, पहा कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस
Shivsena Vs Shinde : प्रभादेवीत मध्यरात्री शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा; आमदार सरवणकरांचा हवेत गोळीबार?
Mumbai Local Train Mega Block : रविवारी घराबाहेर पडताय? मध्य आणि हार्बर मार्गावर ‘मेगाब्लॉक’, ही बातमी नक्की वाचा…
Nandurbar Accident : नंदुरबार जिल्ह्यातील चरणमाळ घाटात भीषण अपघात, लक्झरी बस पलटी झाल्याने 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी
JEE Advanced Result 2022 : JEE-Advance चा निकाल आज जाहीर होणार; ‘असा’ डाउनलोड करा निकाल, जाणून घ्या
Dhule: धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! 290 बोगस डॉक्टर मात्र कारवाई फक्त पाच जणांवर

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares