Sharad Pawar : महागाईचा परिणाम कृषी आणि उद्योगांवर, रोजगारही कमी झाले, शरद पवारांचा केंद्रावर – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 11 Sep 2022 12:46 PM (IST)
Edited By: गणेश लटके
Sharad Pawar
Sharad Pawar : 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत, सन्मानाबाबत वक्तव्य केलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी गुजरातमध्ये भाजपच्या सरकारानं बिल्कीस बानोच्या गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचं काम केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. 2014 मध्ये घरगुती गॅसचे दर हे 410 रुपयांवर होते ते आज 1000 रुपयांवर गेले आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. याचा परिणाम सर्व व्यवसायांवर झाला आहे. तसेच याचा परिणाम कृषी आणि उद्योगांवर झाला असल्याचे पवार म्हणाले. रोजगार कमी झाले असल्याचेही पवार म्हणाले.
शेतकऱ्यांवर कोणतही संकट आल्यानंतर आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे असेही शरद पवार यावेळी म्हणाले. सांप्रदायिक शक्तिविरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं असेही शरद पवार म्हणाले. आज देशातील नागरिकांसमोर वाढती महागाई ही मोठी समस्या आहे. महागाईचा दर वाढला आहे. पेट्रोल, डिझेल, खायच्या वस्तूंचे दर वाढले आहेत. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे पवार म्हणाले. आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 8 व्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बघितला तर आपल्याला समजते की ते दिल्लीच्या सत्तेसमोर कधीही झुकले नाहीत. शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर हे आमचे आदर्श असल्याचे शरद पवार म्हणाले. आज दिल्लीच्या ऐतिहासीक मैदानावर आपण सगळे एकत्र आलो आहोत. बाजीराव पेशवे पुण्यातून दिल्लीत आले होते. त्यांनी दिल्लीच्या शासनाला आव्हान दिल्याचे पवार म्हणाले. गेल्या 75 वर्षात देशावर अनेक संकटे आली असल्याचे पवार म्हणाले. या काळात देशात खूप बदल झाल्याचा उल्लेख देखील पवारांनी केला. 
देशातील 56 टक्के लोकसंख्या शेती करत आहे. देशाला अन्न पुरवण्याचे काम शेतकरी करत आहेत. जगातील अनेक देशात अन्नधान्य पुरवण्याचं काम भारतातील शेतकरी करत असल्याचे पवार म्हणाले. पण दुर्दैवाने देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.दरम्यान, केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे केले होते. हे कायदे 15 मिनीटात संसदेत पारित केले होते. याविरोधात एक वर्ष दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनाला भाजपने विरोध केला. निर्दोष शेतकऱ्यांवर कारवाई केल्याचे पवार म्हणाले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सतत शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करेल असेही पवार यावेळी म्हणाले.

Todays Headline 12th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
डोलीतून नेत असताना महिलेची रस्त्यातच प्रसूती, पालघरमधील मोखाडा भागातील घटना  
Nagpur : तपास यंत्रणांनी हत्या प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, डॉ. हमीद दाभोळकर यांची टीका
Maharashtra Corona Update : सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट, रविवारी राज्यात 701 नव्या रुग्णांची नोंद 
मुंबई महापालिका निवडणूक पुढील वर्षी? शेलारांच्या खांद्यावर गुजरातमधील 10 जागांची जबाबदारी
SL vs PAK, Asia Cup 2022: श्रीलंकेनं पाकिस्तानचा 23 धावांनी उडवला धुव्वा; आशिया चषकावर सहाव्यांदा कोरलं नाव
Bharat Jodo Yatra: ‘आम्ही देशाला जोडण्याचे काम करत आहोत, पण हे लोक तोडण्याचा प्रयत्न करत आहे’, काँग्रेसची भाजपवर टीका
PAK vs SL, Asia Cup Final: श्रीलंकेच्या भानुका राजपक्षेची एकाकी झुंज; पाकिस्तानला विजयासाठी 171 धावांची गरज
Taragiri : भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली! ‘तारागिरी’ युद्धनौका लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्य!
Veda Krishnamurthy: कर्नाटकच्या क्रिकेटपटूनं वेदा कृष्णमूर्तिला केलं प्रपोज; इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटो पोस्ट

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares