केएमटी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
केएमटी बस आज
हद्दवाढ समिती रोखणार
कोल्हापूर, ता. ११ ः केएमटीच्या २४ मार्गांवर बस धावत असून, त्यातील २२ ग्रामीण भागातील आहेत. यामुळे केएमटीचे नुकसान होत असल्याने शहराबाहेर जाणाऱ्या या बस सोमवार (ता. १२) पहाटे पाच वाजता कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समिती रोखणार आहे. हे शहरातील जनतेचे कररूपाचे पैसे वाचवण्याचे अभियान असल्याचे ॲड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले आहे. केएमटीचे दररोजचे उत्पन्न पावणेसात लाखांपासून साडेसात लाखांपर्यंत आहे.
प्रत्येक बसच्या खर्चापेक्षा उत्पन्न कमी असल्याने तोटा सहन करावा लागत आहे. सात किलोमीटर इतकाच शहराचा परीघ असल्याने उत्पन्नासाठी बस परिसरातील ग्रामीण भागात सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. परिणामी ग्रामीणमधील २२ विविध मार्गांवर बस धावतात. सध्या केएमटीचे अपेक्षित उत्पन्न नसल्याने पगार, विविध देणी भागवण्यासाठी महापालिकेने चार वर्षांत ४५ कोटींचे अनुदान दिले. तो धागा पकडत तसेच हद्दवाढीबाबत ग्रामीणमधून विरोध झाल्यानंतर हद्दवाढ कृती समितीने ग्रामीणमधील मार्ग बंद करण्याची मागणी केली. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत किमान दोन गावांच्या फेऱ्या बंद करा, अशी मागणी केली होती. त्यानुसार केएमटीने कुडित्रे, बहिरेश्‍वर, म्हारूळ हे मार्ग आजपासून बंद केले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने इतर मार्गांवरील सेवा बंद कराव्या लागतील, आंदोलन करू नये, असे केएमटीने समितीच्या पदाधिकाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. समितीने हे आंदोलन नसून अभियान असल्याने बस रोखण्याची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे पहाटे पाच वाजता बुद्धगार्डन या केएमटीच्या यंत्रशाळेतून बस बाहेर पडू देणार नाही, असे ठरवले आहे.
———-
शहरात जाणारा दूध,
भाजीपाला बंद करू ः पाटील
कुडित्रे ः कुडित्रे बस बंद केल्यास शहरात जाणारा दूध, भाजीपाला बंद करू, असा इशारा यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिला आहे. परिसरातील नागरिक, शेतकरी यांची बैठक घेऊन आंदोलन करू, असाही इशारा यावेळी दिला आहे. केएमटी तोट्यात असल्याच्या मार्गावरील बस सेवा बंद करा, अशी मागणी हद्दवाढ कृती समितीने केल्यामुळे कुडित्रे, म्हारुळ, बहिरेश्वर बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांची व शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. यावेळी बदाम शेलार, आनंदा पाटील, सुभाष पाटील, गुणाजी शेलार उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares