दुचाकी रॅली काढून अस्तरीकरणास पाठिंबा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
वालचंदनगर, ता.११ : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या जनजागृतीसाठी दुचाकी रॅलीचे आयोजन करुन सोमवारी (ता. १२ सप्टेंबर) होणाऱ्या रास्तारोको आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
अस्तरीकरणाच्या मागणीचा जोर वाढू लागला आहे. इंदापूर तालुक्यातील २२ गावांतील शेतकऱ्यांनी अस्तरीकरणासाठी पाठिंबा दिला आहे. अस्तरीकरणाच्या पाठिंब्यासाठी सोमवार (ता.१२) रोजी बारामती-इंदापूर राज्यमार्गावर भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. याची जनजागृती मोहिम पश्‍चिम भागामध्ये जोरदार सुरू आहे. आज सकाळी निरवांगी-निमसाखर-बोंद्रेवस्ती-जाधववस्ती-कारंडेवस्ती मार्ग दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये निमसाखरमधील शेतकरी सहभागी झाले होते. इंदापूरच्या पश्‍चिम भागातील खोरोची, बोराटवाडी, निरवांगी, निमसाखर, शिरसटवाडीमधील शेकडो शेतकरी सहभागी होणार आहेत. तसेच काही शेतकरी जनावरे घेवून रास्तारोको आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहेत.

02495
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares