पिक नुकसानभरपाई २०२२ बँकेत जमा होण्यास सुरुवात

Written by

शेतकरी योजना 2022
नमस्कार शेतकरी बंधूंनो पिक नुकसानभरपाई २०२२ बँक खात्या मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हि नुकसान भरपाई कशी मिळत आहे आणि किती मिळत आहे हेच या ठिकाणी आपण जणू घेणार आहोत. शेतकरी बांधवांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून या नुकसानीची पाहणी करण्यात आली होती शिवाय पंचनामे देखील करण्यात आले होते.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्याज प्रमाणात नुकसान झाले होते त्यांना पिक नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आलेली होती.
आता हि नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हि नुकसानभरपाई जमा होत आहे. याचे एक ताजे उदाहरण आम्ही तुम्हाला या ठिकाणी देत आहोत.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने पैसे जमा होत आहेत हे तर आपण जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी नुकसानभरपाई संदर्भात शासनाचे नेमके धोरंज काय आहे ते जाणून घेवूयात.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या वर्षी अतिवृष्टी आणिज पुराचा खूप मोठा फटका बसला परिणामी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते.
या नुकसानभरपाईसाठी शासनाने गुरुवारी सायंकाळी म्हणजेच ८ ऑगस्ट २०२२ रोजी १ हजार ८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.
शासनाने जाहीर केलेली हि मदत औरंगाबाद विभागातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
तर वरीलप्रमाणे हि पिक नुकसानभरपाई २०२२ मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मदत कशा पद्धतीने जमा होत आहे याचे प्रत्यक्ष उदाहरण जाणून घ्यायचे असेल तर खालील व्हिडीओ पहा.
पिक नुकसानभरपाई २०२२ आर्थिक मदत देण्यासाठी यावेळी क्षेत्र मर्यादा वाढवून देण्यात आली होती. आता ज्या शेतकरी बांधवांकडे ३ हेक्टर शेती असेल आणि त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल अशा शेतकरी बांधवाना देखील पिक नुकसानभरपाई आर्थिक मदत मिळणार आहे.
हि मदत पूर्वी २ हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिली जात होती ती आता ३ हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिली जाणार आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
शेतकऱ्यांना दिली जाणारी हि मदत आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमचे जर ऑनलाईन बँकिंग असेल तर लगेच तपासून पहा किंवा तुमच्या बँक शाखेला भेट  देवून या मदतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
Your email address will not be published.


source

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares