शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ओतूर येथे उद्या आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
ओतूर, ता.११ : येथील (ता.जुन्नर) मार्केट यार्ड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस (आय) आणि शेतकरी संघटना जुन्नर तालुका आयोजित शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी (ता.१३) रोजी सकाळी ९ वाजता शेतकरी जन आक्रोश आंदोलन होणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले व माजी पंचायत समिती सभापती विशाल तांबे यांनी दिली.
या आंदोलनाला शेतकरी बांधवांच्यासोबत राज्याचे माजी सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंढे, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखानाचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीचे माजी सभापती ॲड.संजय काळे, शेतकरी नेते तानाजी बेनके, अंबादास हांडे, लक्ष्मण शिंदे, जुन्नर तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष अशोक घोलप, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, शेतकरी संघटना अध्यक्ष संजय भुजबळ हे व शेतकरी बांधव उपस्थित राहणार आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares