४५ दिवसांत १३७ शेतकरी आत्महत्या;काहीही करा पण शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखा ! – elokmanya – ELokmanya News Portal

Written by

टीम ई-लोकमान्य | मुंबई- राज्यात झालेली अतीवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेत नियम २९३ अन्वये प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.मागील महिन्यात अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ज्या गोष्टी निदर्शनास आल्या त्याबद्दल सभागृहात माहिती देऊन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,असा इशारा दिला.
राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत.मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागील ४५ दिवसांत १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी काय करायचं? शेतकऱ्यांना हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा, अशी सूचना मा. अजितदादांनी केली.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले पाहिजे.तसेच पवार साहेबांप्रमाणेच इतरही कृषितज्ज्ञांना भेटावे आणि उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागले तरी काढा, पंतप्रधानांना भेटा, केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटा, काहीही करा पण शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
अतिवृष्टीबाबत बोलत असताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांना पिकांसाठी ७५ हजार रुपये आणि फळबागांसाठी दीड लाखांची हेक्टरी मदत करावी, अशी मागणी पुन्हा केली. तसेच इतरही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधले. राज्यात मागील दोन महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. अजूनही पाऊस पडत आहे. राज्यातली सर्व धरणे भरलेली आहेत. हवामान खात्याने यापुढेही पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर मोठा पाऊस झाला तर धरणातील पाणी ओव्हरफ्लो होऊन नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. धरणातून पाणी सोडण्यात थोडी जरी चूक झाली तर त्याचा फटका खालच्या बाजुच्या लोकांना भोगावा लागू शकतो. त्यामुळे पाऊस संपेपर्यंत पाटबंधारे खात्याचा अधिकारी रात्रीच्या वेळी धरणावर असला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्रातील अनेक भागात नद्यांमध्ये अतिक्रमण होत आहे. नदीत राडारोडा टाकला जातोय. त्यामुळे नदीचे पात्र उथळ होत आहे. चंद्रपूर शहरात तर ही समस्या गंभीर झाली आहे. नदीमधील अतिक्रमण रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. तसेच पुरामुळे खचलेल्या विहिरी दुरुस्त करुन देण्यासाठी मनरेगा म्हणून मदत दिली पाहीजे. अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांबाबत एनडीआरएफचे निकष जाचक आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेले जनावर कसे काय शोधणार? याबाबतीत निकष बदलून मदत करावी. पीक कर्ज माफ केले पाहिजे. ज्या घरांचे नुकसान झाले त्यांनाही मदत दिली पाहिजे. घर पूर्ण पडले किंवा अंशतः पडले तरच मदत दिली जाते. पण काही घरांना ओलावा येऊन भेगा पडतात. अशा घरांनाही मदत देण्यासाठी पंचनामे केले पाहिजेत. या अतिवृष्टीच्या काळात गोगलगायींचा प्रादुर्भाव मराठवाड्यात पाहायला मिळाला. आपल्या मदतीच्या निकषांमध्ये गोगलगायीने पिकांचे नुकसान केल्यास मदतीची तरतूद नाही. त्यामुळे या बाबीचा वेगळा निर्णय सरकारने घ्यावा,असे अजित पवार म्हणाले.

टीम ई-लोकमान्य | नवी दिल्ली – राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला पर्यावरण विषयक नियमांचं पालन न केल्यानं तब्बल १२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे.न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल यांनी राष्ट्रीय…
टीम ई-लोकमान्य | मुंबई- देशात सध्या भितीचे वातावरण आहे आणि या देशातील भीतीच्या वातावरणाच्या विरोधात लढण्यासाठी लोक तयार आहेत आणि ते सर्वजण पवार साहेबांकडे आशेने पाहत आहेत.सत्ताधाऱ्यांच्या विरोधात…
टीम ई-लोकमान्य | मुंबई- महाराष्ट्राचा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक नाहीये.आज नगर जिल्ह्याचा पालकमंत्री तो हसन मुश्रीफ नाहीये आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण नाहीये हे संबंधितांनी लक्षात ठेवावं.सध्या…
टीम ई-लोकमान्य | मुंबई- ईडी वा अन्य केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून, ओरबाडून, लोकशाहीचा अवमान करून महाराष्ट्रातील सरकारचा सुरु असलेला कारभार अतिशय दुर्दैवी आहे, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे…
टीम ई-लोकमान्य | इंदापूर- राज्यातील नव्याने स्थापन झालेले सरकार हे दळभद्री सरकार आहे.या सरकारच्या लोकप्रियतेवर लोकसभेला 45 प्लस चे स्वप्न पाहणे हे स्वप्नच राहून ते धुळीस मिळाल्या शिवाय…
Your email address will not be published.


We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

© 2021 ELokmanya Media’s -Designed By Shubham Nadhavale(7757910341)
© 2021 ELokmanya Media’s -Designed By Shubham Nadhavale(7757910341)

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares