Ajit Pawar : "मी वॉशरूमला गेलो होतो पण नाराज असल्याच्या अफवा पसरल्या" – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मुंबई : सध्या राज्यात मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच राज्यभरात प्राण्यामध्ये वेगाने पसरत असलेल्या लम्पी या आजारावर राज्य शासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. लम्पी आजाराबद्दल बरेचसे गैरसमज दूर करणे गरजेचे असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर काल राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात झालेल्या नाराजीवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
(Ajit Pawar On Lampi Disease)
"लम्पी आजारामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून त्यामुळे दूध व्यवसायावर परिणाम झाला आहे. हा आजार झालेल्या प्राण्यांचे दुधही शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे येत्या हंगामातील साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी लम्पी आजारावर आळा घालणे गरजेचं आहे. अशा प्राण्यांना विमा संरक्षण देण्यासाठीही उपाययोजना सरकारने कराव्यात. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे." असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.
हेही वाचा: Kolhapur : हद्दवाढ कृती समितीचे आंदोलन; शहरातील KMT बससेवा ठप्प
त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला अंगणवाडी सेविकांना बोलवण्यावर अजित पवारांनी आक्षेप घेतला असून ही खूप गंभीर बाब असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर "आजपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री नेमले गेले नाहीत, ही खूप गंभीर बाब आहे. जर पालकमंत्री नेमले गेले नाही तर पैसे कसे खर्च करणार?" असा सवाल विरोधीपक्षनेत्यांनी केला आहे.
"राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी बोलण अपेक्षित असतं. त्यामुळे त्याठिकाणी मी बोलणं टाळलं. कालच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी देशभरातून नेते आले होते. त्यांना बोलायला वेळ हवा होतो म्हणून मी ती भूमिका घेतली. मी वॉशरूमला गेलो होतो पण लोकांनी वेगळा अर्थ काढला आणि उगाच मी नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या." असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी कालच्या अधिवेशनात नाराज असल्याच्या चर्चेवर दिलं आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares